31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस सज्ज
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई : पोलीस अधीक्षक तुषार दोशी
संभाजी पुरी गोसावी
सातारा : खरा पंचनामा
सरत्या वर्षाला निरोप देताय, तर सातारकरांनो सरत्या वर्षाला शांततेत निरोप द्या, आणि नव्या वर्षाचे जल्लोशात स्वागत करा, पोलीस प्रशासनाला सहकार्य कर. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सातारा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
हुल्लडबाजी करणाऱ्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ निर्माण करणाऱ्यांवर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई करणार आहोत असा इशारा पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी दिला आहे. ज्यामध्ये गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवणे, ड्रिंक अँड ड्राईव्ह षयासारख्या नियमांचे उल्लंघन करण्यावर कारवाई करणे आणि सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुरक्षितता राखणे यावर भर दिला जाणार आहे. या करिता सातारा जिल्हा प्रशासन आता सज्ज झाले आहे.
त्या अनुषंगाने 31 डिसेंबरच्या आधी सातारा शहर आणि जिल्ह्याची शांतता व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सातारा पोलीस प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या सर्व प्रभारी अधिकाऱ्यांनाही सुचना केल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.