जयसिंगपूर येथील पेपर विक्रेत्या व्यापाऱ्याला लुबाडणाऱ्या 5 जणांना अटक : व्यापाऱ्याच्या चालकाचाही समावेश
34.55 लाखांचा मुद्देमाल देशी बनावटीचे पिस्तूल जप्त : कराड तालुका पोलिसांची कारवाई
कराड : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील होलसेल पेपर विक्रेत्या व्यापाऱ्याची गाडी अडवून लाकडी दांडके, चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील 33.35 लाखांची रोकड, सोन्याची चेन, लुबाडून त्याच्याकडे 5 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये त्या व्यापाऱ्याच्या गाडीच्या चालकाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. कराड तालुका पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
दि. 18 डिसेंबर रोजी कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 यावर नांदलापूर (ता. कराड) गावचे हद्दीत जयसिंगपूर (ता. शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील पेपर विक्री व्यसाय करणारा होलसेल व्यापारी यांच्या गाडीस धडक देवून त्याची गाडी अडवून त्याचे गाडीचा ताबा घेवून त्यास गाडीतून अज्ञात ठिकाणी फिरवून व्यापारी व त्यांचा चालक नवनाथ चोरमुले यांना लाकडी, दांडके, चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्याचे अपहरण करून 5 कोटीच्या खंडणीची मागणी केली. नंतर त्या व्यापाऱ्याजवळ असलेली 33 लाख 35 हजार 700 रुपयाची रोख रक्कम व अंदाजे 2 तोळे वजनाची 2 लाख रुपये किंमीची सोन्याची चेन अशी एकुण 35 लाख 35, हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जबदरस्तीने नेला होता. याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदरचा प्रकार हा गंभीर व संवेदनशिल असल्याने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी गुन्हयातील फिर्यादी व चालक नवनाथ चोरमुले यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्याने दिलेल्या माहितीनुसार गुन्हयातील इतर पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांचेकडून रोखरक्कम व सोन्याची चैन असे एकुण 34 लाख 55 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल, गुन्हयात वापरलेली गाडी तसेच आरोपीचे ताब्यातून देशी बनावटीची पिस्टल असा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, महेंद्र जगताप, सपोनि सखाराम बिराजदार, उपनिरीक्षक धनंजय पाटील, नितीन येळवे, धनंजय कोळी, संजय जाधव, सचिन निकम, किरण बामणे, सागर बर्गे, प्रफुल्ल गाडे, मयुर देशमुख यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.