चैन स्नॅचिंग करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींच्या आंबेगाव पोलीसांनी आवळल्या मुसक्या !
एकुण 3.92 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
संभाजी पुरीगोसावी
पुणे : खरा पंचनामा
आंबेगाव पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये सातारा पुणे रोडवरील गुजरवाडी गावच्या हद्दीत गाडी रस्त्याच्या कडेला फिर्यादी पार्क करून झोपलेले असता त्यांच्या खिशातील मोबाईल चेन साखळी व मोपेड गाडी ही चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद आंबेगाव पोलीस ठाण्यात दाखल होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी आपल्या पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तपासी अधिकारी आणि अंमलदारांना पाहिजे असणारा आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. त्या अनुषंगाने पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार हनुमंत मासाळ व चेतन गोरे यांनी गोपनीय बातमीदारांच्या माहितीने रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली.
आकाश नरहरी शिंदे (रा. जाधवनगर वडगांव बुद्रुक पुणे) असे त्याचे नाव आहे. तो दरी पुलाजवळ येणार असल्याची माहिती आंबेगाव पोलिसांना लागली होती. आरोपी आकाश शिंदे हा पुलाजवळ येताच आंबेगाव पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेवुन त्याची अधिक कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. तपासादरम्यान आरोपी आकाश नरहरी शिंदे हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी आंबेगाव, सिंहगड, पुणे शहर तसेच बावधन, खडक अशा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आंबेगाव पोलिसांनी त्याच्या ताब्यातील सोन्याची साखळी, मोबाईल, मोपेड गाडीसह एकूण ३.९२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आंबेगाव पोलिसांना यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार सहा. पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश बनसोडे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग मिलिंद मोहिते परिमंडळ आयुक्त परिमंडळ- 2 सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, उपनिरीक्षक मोहन कळमकर, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, हरिश गायकवाड, सुभाष मोरे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शानेधर चित्ते, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, प्रमोद भोसले, राकेश टेकवडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.