Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंडल अधिकाऱ्याकडून 40 हजारांची लाच स्वीकारताना निवासी नायब तहसिलदाराला अटक

मंडल अधिकाऱ्याकडून 40 हजारांची लाच स्वीकारताना निवासी नायब तहसिलदाराला अटक

सोलापूर : खरा पंचनामा

मागील आठ महिन्यांपासून थकीत असलेला पगार मंडल अधिकाऱ्यांना मिळवून देण्यासाठी 60 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या निवासी नायब तहसिलदाराला रंगेहाथ पकडले आहे. एसीबीने ही कारवाई सोलापूर येथे सोमवारी (ता. 15) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास केली आहे.

चंद्रकांत काशिनाथ हेडगिरे (वय 52, पद निवासी नायब तहसीलदार, उत्तर सोलापूर तहसील कार्यालय, सोलापूर रा.ठि. प्लॉट नं. 81/82 शिवरत्न नगर, जुळे सोलापूर जि. सोलापूर (वर्ग:- 2) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 47 वर्षीय मंडळ अधिकाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या हद्दीत मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची एप्रिल 2025 मध्ये तलाठी ते मंडल अधिकारी अशी पदोन्नती झाल्यावर सोरेगाव मंडळ, उत्तर सोलापूर, येथे मंडलाधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. एप्रिल 2025 पासून त्यांना पगार मिळाला नसल्याने त्यांनी उत्तर सोलापूर चे तहसीलदार यांना विनंती केली. परंतु त्यांनी 'मंडळ अधिकारी यांना पगार कशाला लागतो' असे बोलून ती बाब गांभीर्यपूर्वक न घेता आपली जबाबदारी टाळून दिली.

तक्रारदार हे उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदा चंद्रकांत हेडगिरे यांना भेटले. तेव्हा हेडगिरे यांनी तक्रारदार यांना लवकरात लवकर पगार पत्रक तयार करून साहेबांना सांगून पगार करून देतो. त्यासाठी 40 हजार रुपये लाच द्यावी लागेल. अशी तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक निवासी नायब तहसीलदार हेडगिरी यांनी तक्रारदार यांच्याकडे तक्रारदार यांचा 8 महिन्याचा थकीत पगार मिळवून देण्यासाठीची प्रक्रिया राबवून बील पुढे पाठविले आहे. असे सांगून 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 40 हजार रूपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तेव्हा तक्रारदार यांच्याकडून आरोपी लोकसेवक निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांना 40 हजारांची लाच स्वीकारताना संगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर सोलापुर शहर आयुक्तालयातील बाजार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.