Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी; खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी; खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : खरा पंचनामा

पुण्यातील येरवडा कारागृहातील एका बराकीत दोन कैद्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. त्यावेळी एकावर फरशीने हल्ला केल्याने त्यामध्ये एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटने प्रकरणी डोक्यात फरशी घालून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल नागनाथ कांबळे (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे गंभीर जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. तर याप्रकरणी आकाश सतीश चंडालिया (वय ३०, रा. येरवडा), दीपक संजय रेड्डी (वय २७, रा. कामशेत) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा भागातील एका खून प्रकरणात चंडालियाला अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहातील सी. जे. विभागातील बराक क्रमांक एकमध्ये तिघांना ठेवण्यात आले होते. त्यावेळी चंडालिया, रेड्डी आणि कांबळे यांच्यात झाला. त्यातून सोमवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास चंडालिया, रेड्डी यांनी कांबळे याच्यावर फरशीच्या तुकड्याने हल्ला केला. त्या घटनेमध्ये विशाल नागनाथ कांबळे हा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यानंतर विशाल कांबळे याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आकाश सतीश चंडालिया आणि दीपक संजय रेड्डी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.