Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रिक्षा चालकाकडून 400 रुपयांची लाच घेताना महिला वाहतूक पोलिसाला रंगेहात पकडलं

रिक्षा चालकाकडून 400 रुपयांची लाच घेताना महिला वाहतूक पोलिसाला रंगेहात पकडलं

पिंपरी : खरा पंचनामा

पिंपरी वाहतूक विभागातील महिला पोलिस शिपाई आणि ट्रॅफिक वॉर्डन यांनी रिक्षाचालकाकडून लाच स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोघांनाही सापळा रचून पकडले आहे.

400 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पोलिस शिपाई वर्षा विठ्ठल कांबळे (वय 35) आणि ट्रॅफिक वॉर्डन कृष्णा मछिंद्र गव्हाणे (वय 28) यांचा समावेश आहे. दोघांनीही विविध कारणांखाली रिक्षाचालकाकडून लाच मागितल्याचा आरोप आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा पिंपरी, मोरवाडी आणि केएसबी चौक परिसरात प्रवासी वाहतूक करणारा रिक्षाचालक आहे. 17 नोव्हेंबर रोजी जादा प्रवासी घेतल्याचा मुद्दा काढत वर्षा कांबळे आणि कृष्णा गव्हाणे यांनी त्याच्याकडून प्रथम 300 रुपये घेतले. यानंतर 26 नोव्हेंबर रोजी पुन्हा रिक्षा थांबवून दरमहा 'हप्ता' म्हणून 500 रुपयांची मागणी केल्याने रिक्षाचालकाने एसीबीकडे तक्रार नोंदवली.

तक्रारीची पडताळणी करताना दोघांनीही लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने सापळा रचण्याची तयारी केली. शनिवारी केएसबी चौक परिसरात ट्रॅप लावण्यात आला. त्यावेळी ट्रॅफिक वॉर्डन कृष्णा गव्हाणे यांनी तक्रारदाराकडून 400 रुपयांची लाच स्वीकारताच अधिकाऱ्यांनी त्याला जागीच पकडले. पुढील चौकशीत पोलिस शिपाई वर्षा कांबळे हिला देखील ताब्यात घेण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.