राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक राजकुमार खंडागळे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त
सांगली : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्कचे सांगली येथील भरारी पथकाचे निरीक्षक राजकुमार खंडागळे 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सोमवारी निवृत्त झाले. यनिमित्त सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
श्री. राजकुमार खंडागळे २ जुलै १९९३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागामधे नियुक्त झाले होते. गेल्या 32 वर्षात त्यांनी कोल्हापूर, अहिल्यानगर (अहमदनगर), पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यात दुय्यम निरीक्षक तसेच निरीक्षक पदावर सेवा बजावली. डिसेंबर २०२१ पासून ते सांगलीच्या भरारी पथकाचे निरीक्षक म्हणून कार्यरत होते. नोव्हेंबर २०२५ मधे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
भरारी पथक सांगली येथे कार्यरत असताना त्यांनी तसेच त्यांच्या पथकाने १००० पेक्षा जास्त आरोपीवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये गोवा बनावटीचे मद्य तसेच हातभट्टी दारू वरील गुन्ह्यांचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.