Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'आरटीओ' विभागातील बदलीसाठी प्रत्येकी 50 लाखांची डिमांड!

'आरटीओ' विभागातील बदलीसाठी प्रत्येकी 50 लाखांची डिमांड!

नागपूर : खरा पंचनामा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी शनिवारी (ता. 13 डिसेंबर) विधिमंडळाचं नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच नवा बॉम्ब टाकला आहे.

या नव्या बॉम्बेमुळे राज्यातील महायुती सरकारही हादरलं आहे. परब यांनी आरटीओ खात्यातील भ्रष्टाचाराबाबत केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी हिवाळी अधिवेशनात परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कळसकर यांनी आरटीओ विभागातील बदल्यांसाठी 331 अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी 50 लाख रुपये मागणी केली असून त्यापैकी 245 अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे याबाबत तक्रार केल्याची माहिती परब यांनी दिली आहे.

अनिल परब म्हणाले, राज्यातील तब्बल 331 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी आरटीओचे अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर यांनी प्रत्येकी 50 लाखांची मागणी केली. महत्त्वाची बाब म्हणजे त्यापैकी पहिले 10 लाख रुपये आधी द्या, नंतर मग पोस्टिंग करतो असं कळसकर म्हणत असल्याचंही परब यांनी यावेळी सभागृहात निदर्शनास आणून दिलं. तसेच 331 पैकी 245 अधिकाऱ्यांनी कळसकर याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचंही ते म्हणाले.

याबाबत संबंधित मंत्र्यांना काहीच माहिती नसणार असंही माजी मंत्री अनिल परब म्हणाले. तसेच 245 तक्रारींची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी विधान परिषदेच्या सभागृहात लावून धरली. तसेच सरकार परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर यांच्यावर नेमकी काय कारवाई करणार याविषयीही विचारणा परब यांनी केली.

अनिल परब यांनी म्हणाले, आरटीओमध्ये अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असलेला भरत कळसकर हा अधिकारी त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना काम कसं करायचं याबाबत सांगत आहे. त्याने आजपर्यंत 600 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचं तो सांगत असून माझ्याकडे ब्रह्मास्त्र असल्याचा दावाही त्यानं केला आहे. हे ब्रह्मास्त्र नेमकं कोण आहे याविषयीची माहिती समोर आणण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी अधिवेशनात केली.

शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी यावेळी भरत कळसकर यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला. ते म्हणाले, कळसकर यांनी शेल कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले असल्याचाही दावा केला. तसेच या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कधी आणि काय कारवाई करणार असा संतप्त सवालही परब यांनी उपस्थित केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.