कुची येथील बंद घर फोडणाऱ्यास अटक
7.80 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील बंद घर फोडणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीचे 7.80 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सांगली एलसीबीने ही कारवाई केली.
प्रविण विठ्ठल निकम (वय ३२, रा. कुची ता. कवठेमहाकाळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कुची येथील सुरेखा पाटील घर बंद करून दि. 8 डिसेंबर रोजी परगावी गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्या परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. याबाबत त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यातील चोरट्याना पकडण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते.
चोरट्यांचा शोध घेत असताना एक तरुण तानंग फाटा येथे चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ सोन्या-चांदीचे दागिने सापडले. त्याबाबत कसून चौकशी केल्यावर त्याने कुची येथील बंद घर फोडून दागिने चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्याकडून 7.80 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. त्याला कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, संदिप नलावडे, सोमनाथ गुंडे, सागर लवटे, अमीरशहा फकीर, महादेव नागणे, सागर टिंगरे, सतिश माने, संदीप गुरव, मच्छिद्र बर्डे, उदय माळी, विक्रम खोत, केरबा चव्हाण, सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजीत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.