भाजप खासदार कंगना राणावतला 86 वर्षांच्या आजीने कोर्टात खेचले
भटिंडा : खरा पंचनामा
भाजप खासदार कंगना राणावत यांनी, दिल्लीतील शेतकरी आंदोलनात, सहभागी झालेल्या महिला शेतकऱ्यांना 100-100 रुपयांच्या रोजंदारीवर आणल्याचे म्हटले. हे म्हणताना, कंगना हिने 2020 मध्ये ट्विट देखील केलं होतं. कंगना हिच्या टिप्पणीने दुखवलेल्या 86 वर्षांच्या महिला शेतकरी महिंदर कौर चांगल्याच दुखवल्या आहेत.
महिंदर कौर यांनी 2021 मध्ये कंगनाविरुद्ध खटला दाखल केला. या लढाईत त्या कर्जबाजारी झाल्या आहेत. एकीकडे महिंदर कौर स्वाभिमानाची लढाई लढत असतानाच, कंगना हिला नोटिसा, पत्र पाठवून देखील या खटल्यात एकदाही न्यायालयात हजर राहिल्या नाहीत.
भाजप खासदार कंगना राणावत हिने दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिला शेतकऱ्यांचा अपमान केला होता. त्यांना 100-100 रुपयांच्या रोजंदारीवर येणाऱ्या महिला म्हटलं होतं. यामुळे पंजाबच्या भटिंडामधील महिंदर कौर चांगल्याच दुखावल्या. त्यांनी कंगनाविरुद्ध 2021 मध्ये खटला दाखल केला.
कंगनाविरुद्धच्या या न्यायालयीन लढाईला आता चार वर्षे झाली आहेत. शेतकरी महिंदर कौर माघार घ्यायला तयार नाहीत. विशेष म्हणजे, या चार वर्षांत महिंदर कौर कर्जबाजारी झाल्या आहेत. सात लाखांहून अधिक कर्ज झाले आहे. तरी महिंदर कौर यांनी स्वाभिमानाच्या या लढाईत माघार घेणार नसल्याचे म्हटले आहे. या खटल्याची पुढची सुनावणी पाच जानेवारीला होणार आहे.
शेतकरी महिंदर कौर यांना आता न्यायालयीन लढाईत यश येताना दिसत आहे. न्यायालयाने या लढाईची गंभीर दखल घेतली असून, कंगना हिला वैयक्तिकरित्या हजर राहण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, भटिंडा न्यायालयाच्या याचिकेविरोधात कंगना हिने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिथं याचिका फेटाळल्यावर सर्वोच्च न्यायालयात गेली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने भटिंडा न्यायालयाला हे प्रकरण निकाली काढण्याचा आदेश दिला आहे. कंगना हिच्याकडून माफी मागितली आहे, असे सांगताना हा वाद कशासाठी?, असा प्रश्न केला आहे. परंतु महिंदर कौर यांनी आम्ही चार वर्षे दुःखातून गेलो. त्यावेळी विचारपूस केली नाही. कंगनाने आमची माफी मागावी. कोर्ट त्यांना देईल ती शिक्षा मान्य राहील, असे म्हटले आहे.
मंहिदर कौर यांनी या खटल्याची पार्श्वभूमी सांगताना, न्यायालयाच्या चार वर्षांच्या लढाईत कंगना एकदाही न्यायालयात हजर राहिली नाही. पत्र पाठवली. नोटिसा पाठवल्या. दोन वर्षांनंतर तिचे वकील उच्च-सर्वोच्च न्यायायलात गेले. तिथं माफी मागितली नाही. आता अर्ज दिला आहे की, येण्यात धोका आहे. सेलिब्रिटी असो वा, सामान्य माणूस, कायद्यासमोर सर्व सारखेच असतात. त्यामुळे कंगनाला न्यायालयात हजर राहावेच लागेल, असे सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.