Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली मुख्यालयाच्या 25 लाख होनांच्या 'मनसबदारी'साठी मोठी उठाठेव!

सांगली मुख्यालयाच्या 25 लाख होनांच्या 'मनसबदारी'साठी मोठी उठाठेव!

सांगली : खरा पंचनामा 

मिळवून घेतलेले भाग, ठाण्यांची लाखो होनांची मनसबदारी सर्वश्रुत आहे. पण आता या सर्वावर मात करत मुख्यालयाची मनसबसदारी 25 होनांपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. हीच मनसबदारी टिकवण्यासाठी तसेच ती मिळवण्यासाठी मोठी उठाठेव सुरु असल्याची चर्चा सुरु आहे.

पूर्वी मुख्यालयात ड्युट्या ऍडजेस्ट करण्यासाठी किरकोळ देवाण-घेवाण होत होती. मात्र तक्रारी आणि शिक्षेवर नामचीन मनसबदार मुख्यालयात आले आणि मुख्यालयाचे वारेच न्यारे झाले. या मनसबदारांनी महिनाभर ड्युटी न करता घरात बसून खासगी कामे करण्यासाठी मंथली ठरवून घेतली. रजिस्टरवर हजर प्रत्यक्षात मात्र घरी अशी सोय करून घेतली. शिवाय गावाकडं गार्डाची ड्युटी घेऊन घरीच बसण्याचा नवा फंडा शोधून काढला. यामध्ये मनसबदारीचा प्रदीर्घ अनुभव असलेल्याने काही हजारावरील मनसबदारी 25 लाख होनापर्यंत पोहोचवली.

यातूनच गडकरी असलेल्या 'राखीव'च्या तोंडाला पाणी सुटले. यात एक नंबर साहेबाना पण बिदागी सुरु करण्यात आल्याचे सांगून त्यांची नाहक बदनामी केली गेली. मुख्यालयाची 25 लाखांवर मनसबदारी नेणाऱ्याला अजूनही बक्षीस दिले जाते किंबहुना तोच अजून बाहेर राहून ही मनसबदारी सांभाळत असल्याचीही चर्चा आहे.

मुख्यालयाची मनसबदारी सांभाळणारा आणि केवळ रजिस्टरवर हजर असणाऱ्यांवर एक नंबर साहेबांनी कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा सांगलीच्या मुख्यालयायत एखादी अप्रिय घटनाही घडू शकते अशी भीती तेथे काम करणाऱ्या सैनिकांना सतावत आहे. अशी घटना घडण्या आधीच केवळ मंथली बिदागी देऊन कित्येक दिवस गार्डाची ड्युटी करणाऱ्यांसहा रजिस्टरवर हजर राहणाऱ्यांना दणका देणे आवश्यक असल्याचीही चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.