राज्यातील चार आयपीएस अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना
एका उपाधीक्षकांचीही बदली
सांगली : खरा पंचनामा
राज्यातील चार आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीनंतर त्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सह सचिव सुग्रीव धपाटे यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत. तर कार्यासन अधिकारी मृणाल सावंत यांच्या सहीने एका उपाधीक्षकांची बदली करण्यात आली आहे.
बदली करण्यात आलेले अधिकारी :
सौरभ कुमार अग्रवाल : पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे. ते पोलीस अधीक्षक, वर्धा.
अनुराग जैन : पोलीस अधीक्षक, वर्धा ते पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर.
नीलभ रोहन : पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक. छत्रपती संभाजीनगर. ते पोलीस अधीक्षक, हिंगोली.
खंडेराव अप्पा धरणे : पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, छत्रपती संभाजीनगर.
राकेश रावसाहेब जाधव : उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी उपविभाग, जि. चंद्रपूर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश नंतर काढण्यात येणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.