पंतप्रधान नरेंद्र मोदी-राज ठाकरेंची दिल्लीत भेट
दिल्ली : खरा पंचनामा
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट झालेचे वृत्त समोर आले आहे. ही खासगी भेट नसल्याचे देखील सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे यांच्या मेव्हण्याचे लग्न दिल्लीतील हयात हॉटेलमध्ये झाला. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी हे देखील उपस्थित होते. तेथेच राज ठाकरे यांची त्यांच्यासोबत भेट झाली.
दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबईत झालेल्या शेवटच्या प्रचारसभेत राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवाजी मैदानावर एकत्र आले होते.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुंबई महापालिकेत युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे बंधू विरुद्ध भाजप अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.
लग्नसोहळ्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सुप्रीम कोर्टाचे जज, विविध पक्षाचे दिग्गज नेते देखील उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.