Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईत चार नवीन पोलीस ठाणी मंजूर!

मुंबईत चार नवीन पोलीस ठाणी मंजूर!

मुंबई : खरा पंचनामा

वाढती लोकसंख्या लक्षात घेता पोलीस आयुक्त कार्यालयाने केलेल्या मागणीनुसार गृह विभागाने मुंबईत चार नवी पोलीस ठाणी, दोन वाढीव परिमंडळे (उपायुक्तांचे कार्यक्षेत्र) आणि तीन सहाय्यक आयुक्त विभाग मंजूर केले आहेत.

शुक्रवारी घेण्यात आलेल्या या शासन निर्णयामुळे शहरातील पोलीस ठाण्यांची संख्या १०३, तर परिमंडळांची संख्या १५वर जाणार आहे.

लोकसंख्येनुसार शहरातील जुन्या पोलीस ठाण्यांची हद्द कमी करून नवीन पोलीस ठाणी निर्माण करून त्यांची हद्द निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार शहरात सद्यःस्थितीत ९४ स्थानिक पोलीस ठाणी आहेत. सायबर गुन्ह्यांचा वेग लक्षात घेता गृह विभागाच्या मान्यतेने शहरातील दक्षिण, मध्य, पूर्व, पश्चिम आणि उत्तर प्रादेशिक विभागांत प्रत्येकी एक सायबर पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले.

मात्र मालवणी, निर्मलनगर, वाकोला, साकीनाका, घाटकोपर, भांडुप, विक्रोळीतील पार्कसाईट पोलीस ठाण्यांच्या हद्दीत काही वर्षांत लोकसंख्या वेगाने वाढली. त्यामुळे या सात पोलीस ठाण्यांचे विभाजन करून चार नव्या पोलीस ठाण्यांच्या निर्मितीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयाने गृह विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. तो मंजूर करण्यात आल्याचे मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी माध्यमांना कळवले आहे.

भांडुप, पार्कसाइट पोलीस ठाण्यांची हद्द कमी करून नवे महाराष्ट्रनगर पोलीस ठाणे तयार केले जाणार आहे. त्याप्रमाणे घाटकोपर, साकीनाका पोलीस ठाण्यांच्या विभाजनातून असल्फा तर वाकोला, निर्मलनगरच्या विभाजनातून गोळीबार हे नवे पोलीस ठाणे तयार होणार आहे. मालवणीच्या हद्दीतील लोकसंख्या पाहता या पोलीस ठाण्याचे थेट दोन भाग करून मढ-मार्वे हे स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यान्वित होणार आहे.

नव्या पोलीस ठाण्यासाठी १,४४८ अधिकारी, आमदारांची पदे तर १३० कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.