Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग, आरोपपत्र दाखल

'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग, आरोपपत्र दाखल

बंगळूरू : खरा पंचनामा

सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून मतचोरीचे गंभीर आरोप केलेच जात आहेत. त्यांच्याकडून भाजपवर हल्लाबोल होत असतानाच कर्नाटकमधील आलंद विधानसभा मतदारसंघातील मतचोरीचा प्रकार उघडकीस आल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यांनी याबाबत दिल्लीतील पत्रकार परिषदेत पुरावे दाखवले होते. ज्यानंतर आता कर्नाटकात राजकीय भूकंप आला आहे. यानंतर कर्नाटक सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली असून शुक्रवारी (ता. १३) एसआयटीने आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष न्यायालयात दाखल केलेल्या रोपपत्रात भाजपच्या माजी आमदारासह सात जणांची नावे असल्याने मोठी खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मतचोरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

कर्नाटकमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्या होत्या. यावेळी आलंद विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधून तब्बल ५,९९४ मतदारांची नावे हटविण्यात आली होती. तर ही नावे बेकायदेशिरपणे हटविण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. तसेच त्यांनी याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. ज्यानंतर कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने चौकशी सुरू केली होती. यावेळी मतदारांची नावे वगळण्यासाठी ६,०१८ अर्ज आल्याचे समोर आले होते. तर याकामी मारे ४.८ लाख रुपये इतका खर्च केल्याचे तपासात उघड झाले होते.

या तपासात डेटा सेंटर ऑपरेटरला ८० रुपये मोबदल्याचेही उघड झाले होते. ज्यानंतर एसआयटीने भाजपचे नेते सुबोध गुट्टेदार यांच्या संबंधित मालमत्तांवर छापे टाकत कलबुर्गी जिल्हा मुख्यालयातील एका डेटा सेंटरमधूनच हे सर्व अर्ज पाठवविले तपासात निष्पन्न झाले. यानंतरच एसआयटीने आलंदचे चार वेळा आमदार राहिलेले सुभाष गुट्टेदार, त्यांचा मुलगा हर्षानंद गुट्टेदार, त्यांचे वैयक्तिक सचिव टिप्परुद्र यांच्यासह सात जणांविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

एसआयटी विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात २२ हजार पानांचे पुरावे देण्यात आले असून ज्यात फसवणूक, तोतयागिरी, गुन्हेगारी कट आणि विश्वासघात केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या गुन्ह्यासाठी १० वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. तर एसआयटीने दिलेल्या २२ हजार पानांच्या पुराव्यांमध्ये जवळपास १५ हजार पाने निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या डेटाची आहेत. तसेच या तपासात बापी आद्या नामक आरोपीकडून केलेल्या चौकशीत 'OTPbazaar' नावाची वेबसाइट अमेरिकेतील 'SMSAlert' नावाच्या साइटशी जोडली गेल्याचे उघड झाले आहे. त्याद्वारेच कलबुर्गी डेटा सेंटरला OTP बायपास सेवा पुरवल्याचा पोलिसांचा संशय आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.