Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते, आता जयंतरावच मला पत्र देतील की हा महामार्ग करा"शक्तिपीठ महामार्गात बदल

"आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते, आता जयंतरावच मला पत्र देतील की हा महामार्ग करा"
शक्तिपीठ महामार्गात बदल

नागपूर : खरा पंचनामा

शक्तिपीठ प्रकल्प हा धार्मिक पर्यटन आणि राज्यातील संपर्क सुविधा वाढविणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. नागपूर ते गोवा हा मार्ग अनेक जिह्यांमधून जाणार असल्याने पर्यटन, व्यापारी देवाणघेवाण आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी तो लाभदायी ठरणार आहे.

मात्र, धाराशीवमध्ये काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोध दिसून आला होता. यानंतर राज्य सरकारने या मार्गाचे संरेखन बदलण्याचा निर्णय घेतला असून नवा मार्ग सोलापूर आणि सांगलीतून जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना सांगितलं की, "नागपूर गोवा द्रुतगति मार्ग हा एक अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे. त्याचं नाव जरी नागपूर- गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे, मराठवाड्याचे चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल, आणि या संदर्भात मागच्या काळामध्ये काही आक्षेप लोकांचे आले होते, विशेषतः लोकांचा एक आक्षेप होता तो खरा होता की, आपण जी अलाइनमेंट फॉलो केली होती ती लोकांनी आपल्या लक्षात आणून दिली."

"सोलापूर पासून आपली अलाइनमेंट ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला समांतर जात होती, आणि त्याच्यामुळे ग्रीनफिल्ड महामार्ग का बनवतो कारण यामुळे नवीन एरिया ओपन होतात, ग्रीन फील्ड महामार्गामुळे न जोडले गेलेले लोक त्याला जोडले जातातआणि तिथे विकास होतो, म्हणून जयकुमार गोरे आणि सर्वांची आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूर पासून एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे," अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

फडणवीस म्हणाले की, वेगळी नवीन अलाइनमेंट ही चंदगड पासून सोलापूर, सांगलीपासून जाते, आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते, शक्तीपीठ मार्गातून आता त्यांच्याजवळ महामार्गाने पोहोचता येईल, आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की, जयंतरावच मला पत्र देतील की हा महामार्ग करा, याचा मोठा फायदा त्यांच्या मतदारसंघाला होणार आहे, पंढरपूर जवळून तो मार्ग जाईल आधी जॉईंट मेजरमेंट केले आहे, त्याचं संपादन आपण चालू केलेले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.