भाळवणीतील फटाका कारखाना स्फोट प्रकरणी महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी घेतली झाडाझडती
पोलीस पाटीलसह दोषीवर करण्याचे कारवाई आदेश
सांगली : खरा पंचनामा
भाळवणी (ता. खानापूर) येथे फटाका कारखान्यात भीषण स्फोट होउन दोन तरूणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी शनिवारच्या बैठकीत चांगलीच झाडाझडती घेतली. बेकायदा कारखाना सुरु असूनही त्याची दखल घेऊन वेळीच कारवाई न केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. शिवाय या घटनेत पोलीस पाटील याच्यासह जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महानिरीक्षक फुलारी यांनी दिले आहेत.
भाळवणी येथील शोभेच्या दारूचा स्फोट इतका मोठा होता की, पाच किलोमीटर परिसरातील जमीन हादरली, तर गावातील काही घरांच्या खिडक्याच्या व मोटारीच्या काचा फुटल्या होत्या. विट्याजवळ असलेल्या भाळवणी बसस्थानकाजवळ मुल्ला फायर वर्क्स हा शोभेची दारू तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात सोमवारी सकाळी अचानक स्फोट झाला होता. यावेळी आफताब मन्सूर मुल्ला (वय ३० रा. भाळवणी) व अमिर अमर मुलाणी (वय ४० रा. चिंचणी-अंबक) हे दोघे शोभेची दारू कुटण्याचे काम करत होते. अचानक झालेल्या दारूच्या स्फोटात हे दोघेही गंभीर जखमी झाले होते.
स्फोटामुळे फटाके निर्मिती करण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडवरील लोखंडी पत्रे घटनास्थळापासून चारशे ते पाचशे फुटावर जाउन कोसळले. आगीची माहिती मिळताच विटा नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले होते.
पोलिसांनी वेळीच या कारखान्याची दखल घेऊन कारवाई केली असती तर ही घटना टळली असती. त्यामुळे महानिरीक्षक फुलारी यांनी या घटनेवरून संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेऊन त्यांना कानपिचक्या दिल्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.