निवडणूक काळात गुन्हे दाखल असणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करा
निर्भीड वातावरणात निवडणूक पार पाडण्याच्या विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सांगलीतील बैठकीत सूचना
सांगली : खरा पंचनामा
जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशांवर योग्य ती प्रभावी कारवाई करा. एफ.एस.टी.व एस.एस.टी. पथकाच्या कामकाजावर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे. स्टाँगरुम, मतदानाच्या दिवशीचा मतदान केंद्रावर, सेक्टर पेट्रोलिक व मतमोजणीच्या दिवशी कडक आणि चोख बंदोबस्त ठेऊन निवडणुका निर्भीड वातावरणात पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी सचोटीने काम करावे अशा सूचना कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिल्या.
महानिरीक्षक फुलारी शनिवारी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पोलीस मुख्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी न्यायालयाकडून प्राप्त समन्स व वॉरंट बजावणी, सांगली जिल्ह्याच्या रेकॉर्डवरील पाहिजे व फरारी आरोपीचा शोध घेवुन त्यांना अटक करावी, जिल्ह्यातुन तडीपार आरोपी हे परत आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी, गंभीर गुन्ह्यातील परागंदा आरोपींचा शोध घ्यावा, जिल्ह्यातील स्कूटनी कमिटीने शिफारस केलेंले परवानाधारक शस्त्र तात्पुरते जमा झाल्याची माहिती घ्यावी अशा सूचना दिल्या.
निवडणूक काळात गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी शहरात विविध ठिकाणी वेळा बदलून नाकाबंदी व कोबींग ऑपरेशन राबवावे, महापालिका क्षेत्रात विशेष रात्रगस्त तसेच गुडमॉर्निंग पथके कार्यान्वित करण्याबाबत याबाबत आढावा घेवुन मार्गदर्शन केले.
या पुर्वीच्या विविध निवडणुकीच्या दरम्यान दाखल गुन्ह्यांचा आढावा घेवून संबंधितांवर प्रतिबंधक कारवाई करण्याबाबतच्या सुचना दिल्या तसेच नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणी बाबतही सूचना दिल्या. सांगली जिल्ह्यात आदर्श आचार संहितेचे पालन करुन कोणताही अनुचीत प्रकार घडणार नाही या बाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले.
या बैठकीला पोलीस अधिक्षक संदीप घुगे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सांगली व मिरज, कुपवाड हद्दीतील तसेच हद्दीलगदचे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व शाखा प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.