Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर परीक्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची तीन वर्षे..!विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या कोल्हापुरातील कार्यकाळात 'राष्ट्रपती पदका'चा मानाचा तुरा

कोल्हापूर परीक्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची तीन वर्षे..!
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या कोल्हापुरातील कार्यकाळात 'राष्ट्रपती पदका'चा मानाचा तुरा 

कोल्हापूर : खरा पंचनामा 

कोल्हापूर परीक्षेत्रात येणाऱ्या पाचही जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात कायदा आणि सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळेच परीक्षेत्रात पार पडलेल्या विविध निवडणुका, विविध आंदोलने, यात्रा, जत्रा, वारी, स्तंभ अभिवादन अशा अनेक घटना शांततेत पार पडल्या. याबरोबरच गुन्हेगारांना 'मोका'चा दणकाही देण्यात आला. कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी कार्यभार घेऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. याच काळात त्यांना दुसऱ्यांदा मिळालेले 'राष्ट्रपती पदक' कोल्हापूर परीक्षेत्राच्या मानाचा तुरा ठरले. महानिरीक्षक फुलारी यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळाचा 'खरा पंचनामा'ने घेतलेला आढावा...

सद्रक्षणाय...खलनिग्रहणाय... या राज्य पोलिस दलाच्या ब्रीदवाक्याप्रमाणे श्री. फुलारी यांनी पोलीस दलात दाखल झाल्यापासून कर्तव्यनिष्ठपणे सेवा बजावली आहे. त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी या पदापासून कर्तव्य बजावण्यास सुरुवात केली. त्यांनी विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. शिवाय फ्रेंच भाषेवरही त्यांचे प्रभुत्व आहे. त्याशिवाय सायबर क्राईम विषयात पदविकाही प्राप्त केली आहे. राज्य पोलीस दलात काम करताना आपल्या कामाच्या वेगळेपणाची छाप त्यांनी आजपर्यंत राज्यात बजावलेल्या सेवेदरम्यान उमटवली आहे.

त्यांनी चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर सेवा बजावली आहे. त्याशिवाय नागपूर क्राईम ब्रांच येथे सहायक आयुक्त पदही दमदारपणे सांभाळले आहे. पुण्यातील क्राईम ब्रांचमध्ये २००३-०५ या काळात डीसीपी पदावर कार्यरत असताना फुलारी यांनी तेथील गुन्हेगारीचे कंबरडे मोडले होते. सायबर क्राइम, आर्थिक गुन्हे शाखेचे डीसीपी पदही लीलया पार पाडले. राज्य राखीव दलाचे दौंड येथील समादेशक पदावरही काम केले आहे. नाशिक शहरातील मुख्यालयाचे पोलीस उपआयुक्त, नाशिक येथील पोलिस अकादमीचे प्राचार्य आणि उपसंचालक पदावर असताना अनेक अधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. 

सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त, नागपूर शहराचे अपर पोलिस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक परिवहन विभाग, पुणे येथेही त्यांनी सेवा बजावली आहे. दि. 19 डिसेंबर 2022 पासून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक या ते कार्यरत आहेत. त्यांना राज्य शासनाचा विशेष सेवा पुरस्कार, पोलीस महासंचालकांचे पदक, अंतर्गत सुरक्षेबाबत भारत सरकारचे पदक, भारत सरकारच्या सुवर्ण महोत्सवाचे पोलीस पदक, वनश्री पुरस्कार, स्वातंत्र्यदिनी अमृत पदक, विविध सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी संस्था, पत्रकार संघटना यांच्याकडूनही त्यांच्या कार्याची दखल घेत यथोचित सन्मान केला आहे.  

नक्षलवादी क्षेत्रात केलेली उत्कृष्ट कामगिरी, कोरोना महामारीदरम्यान नियमांचे केलेली कडक अंमलबजावणी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे ग्रामीण जिल्ह्यातील जातीय संघर्षावेळी जातीय सलोखा टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न, सामाजिक पोलिसिंगची अंमलबजावणी, विविध क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या गुन्हे उघडकीस आणण्यात मिळालेले यश, कम्युनिटी पोलिसिंग, देशातील अति महत्वाच्या व्यक्तींचे दौरे आणि त्यांची सुरक्षा व्यवस्था याचे चोख नियोजन आणि व्यवस्थापन, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सतत राबवलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, व्हिजिबल पोलिसिंग, स्ट्रीट पेट्रोलिंग, रात्रगस्त, नाकाबंदीची कोल्हापूर परिक्षेत्रात सातत्याने अंमलबजावणी करून गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. 

आगळी-वेगळी 'हॅट्रिक'
पोलिस ठाण्यांच्या इमारती, अधिकारी, अंमलदारांची निवासस्थाने, पोलिसांसाठीची वाहने, आरोग्य सुविधा, पोलिसांच्या मुलांचे शिक्षण याबाबतही त्यांनी दक्षपणे निर्णय घेतले आहेत. आपल्या कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक या पदाच्या कार्यकाळात  लोकसभा, विधानसभा तसेच अन्य महत्वाच्या निवडणुका, पंढपूर येथील आषाढी आणि कार्तिकी वारी, भीमा कोरेगाव येथील स्तंभ अभिवादन, गणेशोत्सव, विविध सण-उत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्याची 'हॅट्रिक'चा एक आगळा-वेगळा विक्रम महानिरीक्षक फुलारी यांच्या नावावर आहे.

दोनदा राष्ट्रपती पदक
पोलीस विभागासाठी उत्कृष्ट योगदान, निष्कलंक सचोटीसह कर्तव्यनिष्ठ, गुणवत्तापूर्ण कामगिरी आणि प्रामाणिक शिस्तप्रिय अधिकारी असा त्यांचा पोलीस दलात नावलौकिक आहे. पोलिसिंगकरिता कौशल्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण योगदान त्यांनी सातत्याने दिले आहे. त्यामुळेच भारत सरकारकडून महामहीम राष्ट्रपती पदक त्यांना दोनदा प्राप्त झालेले आहे. श्री. फुलारी यांनी पोलीस दलात केलेल्या सेवेची ही सर्वोच्च दखल आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.