मुलाने दगडाने ठेचून आई वडिलांचा केला खून
वाटणीच्या कारणावरून हुपरीतील घटना : संशयित ताब्यात
कोल्हापूर : खरा पंचनामा
जन्मदात्या आई वडिलांना दगड, काठीने ठेचून तसेच दोघांच्याही हाताची काचेने नस कापून निर्घृणपणे खून करण्यात आला. घराची वाटणी करण्याच्या कारणावरून हुपरी येथील महावीर नगर मध्ये शुक्रवारी पहाटे घडली. संशयित मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नारायण गणपतराव भोसले (वय 78), विजयमाला नारायण भोसले (वय ७०) अशी मृतांची नावे आहेत. सुनिल नारायण भोसले (वय ४८) असें संशयित मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर तो स्वतःहुन हुपरी पोलिसांत हजर झाला आहॆ. नारायण भोसले पत्नी विजयमाला व हल्लेखोर मुलगा सुनिल यांच्यासह महावीर नगर येथे रहात होते. त्यांना तीन मुले असुन चंद्रकांत याचे व संजय यांचे सराफी दुकान आहॆ. व्यवसायानिमित्ताने ते दोघेही बाहेरगावीच राहतात. सुनिल याचे लग्न झाले असुन त्यांला एक मुलगा व मुलगी आहॆ. त्याची पत्नी मुलासह माहेरी बेळगांव येथे रहाते. त्यामुळे सुनिल हा आई वडील यांच्यासोबत राहात होता.
गेल्या कांही महिन्यांपासून घराची वाटणी करून मिळावी या कारणावरून त्याने आई वडिलांशी भांडण सुरू केले होते. घराची वाटणी करणे कांही कारणाने शक्य नसल्याने आई वडील त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे वैतागलेल्या सुनिलने शुक्रवारी पहाटे साडेपांच वाजण्याच्या सुमारास वडील झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यावर सुरुवातीला काठीने हल्ला करून जखमी केले. त्यानंतर दगडाने ठेचले व खिडकीची काच फोडून त्यांच्या हाताची नस कापली. यावेळी आई विजयमाला बाहेर होत्या. त्या घरात येताच सुनिलने त्यांच्यावरही हल्ला करून काचेने डोक्यात वर्मी घाव घातला व त्यानंतर काचेने त्यांच्याही हाताची नस कापली.
या घटनेनंतर सुनिल स्वतःहुन हुपरी पोलिसांत गेला व घडल्या प्रकाराची माहिती त्याने दिली. पोलिसांनी घडल्या प्रकाराची खात्री करून घेत त्याला ताब्यात घेतले आहॆ.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.