Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'आग लागली की लावली? साधूग्राम विरोधाचा सूड उगवला'सयाजी शिंदे यांच्या देवराईतील हजारो झाडं जळून खाक

'आग लागली की लावली? साधूग्राम विरोधाचा सूड उगवला'
सयाजी शिंदे यांच्या देवराईतील हजारो झाडं जळून खाक

बीड : खरा पंचनामा

अभिनेता सयाजी शिंदे यांच्या बीडमधील देवराई प्रकल्पातील काही झाडांना आग लागल्याची घटना समोर आली आहे. सयाजी शिंदे यांनी मेहनतीला बीड जिल्ह्यातील पालवणजवळ हा प्रकल्प उभा केला होता. तिथं अचानक आग लागली अन् झाडं जळून गेली.

यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. आग लागली की लावण्यात आली अशा प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणात सयाजी शिंदे यांनी रणशिंग फुंगलं होतं. यासाठी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. साधुग्रामच्या उभारणीसाठी राज्य सरकारने कुंभमेळ्यातील १८०० झाडं तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र यावर नाशिकसह राज्यातील अनेक पर्यावरणप्रेमींनी विरोध केला. यामध्ये सयाशी शिंदे यांचंही नाव होतं. साधू आले-गेले तरी फरक पडत नाही, पण झाडं राहिली पाहिजेत अशी थेट भूमिका त्यांनी घेतली होती. याचा सूड उगविण्यासाठी देवराईतील त्यांची झाडं जाळण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
विविध प्रकारच्या प्रतिक्रिया....
आग लागली की लावली? सध्या भूखंडावरील श्रीखंड खाणारी टोळी सत्तेत आहे. वाट्टेल ते करायला तयार आहे.
आग लावली गेली आहे. तपोवन विरुद्ध तुम्ही वणवा पेटवाल म्हणून कोणी तरी हे कांड केलं आहे.
आग लावलीच असणार. हा सूड आहे. पशुपक्षांचा पण विचार करणार नसाल तर जिवंत जळून तडफडून मराल आणि मदतीला कोणीच नसेल.
राजकारणी त्यांचे कार्यकर्ते कोणत्या थराला जातील याचा नेम नाही!
वाईट तर झाले आहे असो खचून न जाता जोमाने कामाला सुरुवात करावी

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.