Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या नऊ जणांना अटकशिरवळ पोलिसांची कारवाई

खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या नऊ जणांना अटक
शिरवळ पोलिसांची कारवाई

सातारा : खरा पंचनामा

मौजे पळशी (ता. खंडाळा) येथील दहाबिगा नावचे शिवारात पळशी-वडगाव-जाधव वस्ती रेसकोर्सकडे जाणाऱ्या तिकाटण्यातील डांबरी रस्त्यावर आणि पळशी येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे संगनमत करून एकाचा खून केल्याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली. शिरवळ पोलिसांनी ही कारवाई केली. यातील तीन संशयितांना बारा तासात तर अन्य सहा संशयितांना मंगळवारी अटक करण्यात आली.

अतिश अशोक राऊत (रा. शिरवळ ता. खंडाळा) असे मृताचे नाव आहे. तेजस बाळासाो भरगुडे (वय ३४, रा. पळशी, ता. खंडाळा), दिपक बाळासाो भरगुडे (वय ३२, रा. पळशी ता. खंडाळा), ऋषिकेश जगन्नाथ मळेकर (वय २८, रा. शिंदेवाडी ता. खंडाळा) यांना बारा तासात अटक करण्यात आली. तर अविष्कार अनिल भरगुडे (वय २५), ऋषिकेश रामचंद्र भरगुडे (वय २७), नितिन पांडुरंग भरगुडे (वय ३२), गणेश साधु भरगुडे (वय २६), सागर धनाजी भरगुडे (वय ३६), तुषार दत्तात्रय भरगुडे (वय ३५, सर्व रा पळशी ता. खंडाळा) यांना आज मंगळवारी अटक करण्यात आली आहे.

संशयितानी संगनमत करुन मृत राऊत याच्या डोक्यात, तोंडावर, पाठीवर मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता साताऱ्यातील सिव्हील हॉस्पीटल नंतर सह्याद्री हॉस्पीटल पुणे येथे दाखल केले असता तो उपचारादरम्यान मयत झाला. संशयितानी अतिश राऊत याचा अपघातात मृत्यु झाला असे भासवून खुनाची घटना लपविण्याचा प्रयत्न केला होता. त्याची माहीती पोलीसांना मिळताच पोलीसांनी तात्काळ अतिश याचे वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक वैशाली कडुकर, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक निरीक्षक सुशिल भोसले, लोणंद पोलीस ठाणेचे सहायक  निरीक्षक किर्ती म्हस्के, उपनिरीक्षक सतिश आंदेलवार, विलास यादव, संजय सपकाळ, नितिन नलवडे, सचिन वीर, सुनिल मोहरे, तुषार कुंभार, प्रशांत धुमाळ, अजय झुंजार, अजित बोराटे, अरविंद बा-हाळे, भाऊसाहेब दिघे, अक्षय बगाड, मंगेश मोझर, दिपक पालेपवाड, अक्षय नेवसे, धीरज टिळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.