बुधगावमध्ये गोदामातील साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक
सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील बुधगाव येथील गोदामात ठेवलेले गणेश मंडळाचे साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 25 हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
बलराज बलराम गोसावी (वय १९) प्रेम लखन गोसावी (वय २१, दोघेही रा. गोसावी गल्ली, बुधगाव. ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बुधगाव येथील शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळाचे साहित्य एका गोदामात ठेवले होते. दोघांनी त्याचे कुलूप तोडून त्यातील साहित्य लंपास केल्याची फिर्याद सांगली ग्रामिण पोलीस ठाण्यात दिली होती. यातील चोरट्याना पकडण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी ही चोरी बलराज, प्रेम गोसावी यांनी केल्याची माहिती मेघराज रुपनर यांना मिळाली. त्यांनी पथकासह जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेले 25 हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले.
सांगलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, पोलीस निरीक्षक बी.ए. तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कल्याणी शिंदे, मेघराज रुपनर, बंडू पवार, अभिजीत पाटील, महेश जाधव, शेखर पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.