"शरद पवार माझ्यासाठी मेंटोर आहेत... "
बारामती : खरा पंचनामा
बारामतीमध्ये आज पवार कुटुंबीय एकाच मंचावर आले होते. विद्या प्रतिष्ठानच्या एआयच्या इमारतीचं उदघाटनाच्या कार्यक्रमाला काका-पुतण्यात एकाच मंचावर होते. विशेष म्हणजे उद्योगपती गौतम अदानीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना गौतम अदानी यांनी शरद पवार यांचे कौतूक केले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीबाबत वेगवान घडामोडी होत असताना बारामतीत शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिघे गौतम अदानींसोबत एका कार्यक्रमासाठी एकत्र आले. बारामतीत शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेंसचं उद्योगपती गौतम अदानी यांनी उदघाटन केलं. या कार्यक्रमासाठी अदानी बारामतीत दाखल झाले त्यावेळी अदानींच्या स्वागताला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह रोहित पवारसुद्धा पोहोचले. आमदार रोहित पवार यांनी यावेळी अदानी यांच्या कारचे सारथ्य केले तर बाजूला अजित पवार बसले होते. यानंतर ताफा विद्या प्रतिष्ठानकडे गेला. यावेळी अवघं पवार कुटुंबीय अदानींच्या स्वागताला हजर होते. अदानी यांनी 2022 मध्ये बारामतीला भेट दिली होती. जिथे त्यांनी विज्ञान आणि नवोन्मेष क्रियाकलाप केंद्राच्या उद्घाटनात भाग घेतला होता. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार गौतम अदानी, उपमुख्यमंत्री अजित पवार, माळेगांवच्या शरद पवारांच्या गोविंद बाग निवासस्थानी दाखल झाले. सर्व पवार कुटुंबासह अदानींनी भोजनाचा आस्वाद घेतला.
अदानी म्हणाले, मला या कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल मी आभारी आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे. काही अशी ठिकाण असतात जी नकाशावरील बिंदू नसतात. ते प्रगती, परिवर्तन आणि असिम शक्यतांचे प्रतिक बनतात. बारामती हे प्रतिक आहे. बारामतीला शरद पवारांच्या रुपाने व्हिजनरी नेता लाभलाय. जे माझे मेंटोरदेखील आहे. 3 दशकांपासून मी त्यांना ओळखतो हे माझे भाग्य आहे. माहितीपलिकडे त्यांचे व्हिजन दृष्टी असते.
माझ्यासाठी ते मेंटोर आहेत. बारामीतीला मी अनेकवेळा आलोय. त्यावेळी मला शरद पवारांचे व्हिजन दिसते. लोकल मार्केट, शिक्षण, इंडस्ट्री पॉलिसी, स्टार्टअप अशा विविध गोष्टींनी शरद पवारांनी बारामतीत बदल केलाय. त्यांच्याकडे बारामतीच्या विकासाची ब्लू प्रिंट आहे. शेतीपासून विविध राष्ट्रीय मुद्द्यांवरही या राष्ट्रीय नेत्याची भूमिका महत्वाची असते, असेही अदानी म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.