मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी!
कोयत्याचा वार लाठीवर झेलत कॉन्स्टेबलने वाचवला व्यावसायिकाचा तर महिला पोलिसाने सिपीआर देऊन वाचवला चालकाचा जीव
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई पोलीस वाहतूक विभागाच्या महिला कॉन्स्टेबलने एका चालकाला सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवले, तर दुसरीकडे खार पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबलने कोयत्याचा वार पोलीस लाठीवर झेलत व्यावसायिकाचा जीव वाचवला. या दोन्ही घटना मुंबई पोलीस दलाला शोभेल अशा कौतुकास्पद आहेत.
मुंबई वाहतूक पोलीस वाहतूक विभागाच्या वडाळा वाहतूक शाखेत काम करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपाली मंडले यांनी हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या वाहन चालकाला सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवले होते. महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत असतानाच खार पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अनिल दत्तू जाधव यांनी काही जण एका व्यावसायिकाची हत्या करण्याच्या प्रयत्नात असताना अनिल जाधव यांनी एकट्याने व्यावसायिकावर होणारा हल्ला परतवून लावत व्यावसायिकाचे प्राण वाचवले.
घडले असे की, खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे व्यावसायिक हेमंत दलाल आणि हल्लेखोर आरोपी रोशन रमेश पटेल उर्फ सिंग सोबत वाद झाला. आरोपीने त्यांना बांबूने मारहाण केली व घरातून कोयता आणत जखमी व्यावसायिक हेमंत दलाल यांना जीवे ठार मारण्याकरिता त्यांच्यावर वार करण्यात येत होते. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून खार रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पोलीस चौकीवर कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल अनिल दत्तू जाधव हे तेथे तात्काळ दाखल झाले. आरोपी रोशन रमेश सिंग हा व्यावसायिक हेमंत दलाल यांच्या डोक्यावर कोयताचा वार करणार तेवढ्यात पोलीस कॉन्स्टेबल अनिल जाधव यांनी पोलीस लाठी मध्ये घालून हा हल्ला हाणून पाडत, आरोपी रोशन पटेल यांना कोयत्यासह ताब्यात घेत व्यावसायिक हेमंत दलाल यांचा जीव वाचवला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.