Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नगरसेविका पतीचा खून प्रकरण : अजितदादांच्या जिल्हाध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा दाखल

नगरसेविका पतीचा खून प्रकरण : अजितदादांच्या जिल्हाध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा दाखल

रायगड : खरा पंचनामा

जिल्ह्यातील खोपोली शहर आज एका क्रूर हत्येने हादरले आहे. खोपोली नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून विजयी झालेल्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे (माजी नगरसेवक) यांची सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भर रस्त्यात निघृण हत्या करण्यात आली.

मंगेश काळोखे हे आपल्या मुलांना शाळेत सोडून घरी परतत होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या कारमधून उतरलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. प्राणघातक जखमांमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, पक्षाचे जिल्ह्याचे प्रवक्ता भरत भगत यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रत्यक्ष हत्या आणि कट रचणारे अशा एकूण १० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सुधाकर घारे हे सुनील तटकरे यांचे समर्थक असून त्यांनी कर्जत विधानसभेत शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अवघ्या पाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

या हत्येनंतर खोपोलीत तणाव निर्माण झाला असून, बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. काही ठिकाणी जमावाने पोलिस स्टेशनला घेराव घातला असून, सब-इन्स्पेक्टरच्या निलंबनाची मागणी केली जात आहे. मंगेश काळोखे यांनी पूर्वी जीवाला धोका असल्याचे पोलिसांना सांगितले होते, पण योग्य कारवाई न झाल्याचा आरोप होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.