Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

टेम्पोमधून वैद्यकीय शस्त्रक्रियेचे साहित्य चोरणाऱ्या तीन महिलांना अटकपाच लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली शहर पोलिसांची करावाई

टेम्पोमधून वैद्यकीय शस्त्रक्रियेचे साहित्य चोरणाऱ्या तीन महिलांना अटक
पाच लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली शहर पोलिसांची करावाई 

सांगली : खरा पंचनामा

शहरातील झुलेलाल चौक परिसरात उभ्या असलेल्या टेम्पोमधून वैद्यकीय शस्त्रक्रियेचे साहित्य चोरणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली. 

कल्पना सुखलाल जाधव-गोसावी (वय ४०), सुनिता अनिल घाडगे (वय ३८, रा. गोसावी गल्ली, सम्राट व्यायाम मंडळजवळ, सांगली), राणी विलास ऊर्फ पेदान्ना गोसावी ऊर्फ मद्रासी (वय ४०, गोसावी गल्ली, माधवनगर) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.

पुणे येथील कल्पक मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे विक्री प्रतिनिधी हर्षल हिराचंद देशपांडे हे वैद्यकीय शस्त्रक्रियेचे साहित्य असलेला टेम्पो (एमएच १२ युएम ६३६२) घेऊन सांगलीत आले होते. २८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते २९ रोजी सकाळी ७.३० या दरम्यान अज्ञातानी पाच लाख रूपयांचे साहित्य लंपास केले. याबाबत देशपांडे यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

दरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखेतील उपनिरीक्षक सागर होळकर व पथक गस्त घालत असताना संदीप पाटील, सतीश लिंबळे, संतोष गळवे, गौतम कांबळे यांना वैद्यकीय साहित्य साहित्य चोरणाऱ्या महिला सम्राट व्यायाम मंडळाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तीन महिलांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचे पाच लाखांचे साहित्य जप्त केले. 

सांगली शहरचे पोलीस उपाधीक्षक संदीप भागवत, शहरचे निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, सतीश लिंबळे, संतोष गळवे, गौतम कांबळे, विनायक शिंदे, आयेशा मुल्ला, रेखा पाटील, रफीक मुलाणी, प्रशांत पुजारी, संदीप कोळी, विशाल कोळी, योगेश सटाले, दिग्विजय साळुंखे, योगेश हाक्के, गणेश कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.