अखेर 'त्या' तडीपार गुंडाला भाजपने पक्षात घेतलंच; हत्या, खंडणींच्या गुन्ह्यात सहभाग
मुंबई : खरा पंचनामा
भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतंच नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निकालानंतर पक्षाच्या धोरणांवर टीका करताना जसे शनिशिंगणापूरला दरवाजे नाहीत, तसे आमच्या पक्षालाही दरवाजे नाहीत. कोणीही येतो, कोणीही जातो, असं वक्तव्य केलं होतं.
मुनगंटीवार बोलले त्यात तथ्य देखील आहे, कारण मागील काही दिवसांपासून निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करायला सुरूवात केल्याचं दिसत आहे. यासाठी ते कोणालाही आपल्या पक्षात प्रवेश देत आहेत. मग तो कितीही मोठा गुन्हेगार असो वा भ्रष्टाचाराचे आरोप असलेला नेता.
भाजप या सगळ्यांना पक्षात सामावून घेत आहे. अशातच आता ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदे याला भाजपने पक्षात घेतलं आहे. यापूर्वी मयूर शिंदेने ठाण्यात भाजपप्रवेशासाठी मोठी बॅनरबाजी केली होती. मात्र, भाजप गुंडाला पक्षात घेत आहे, अशी टीका झाल्याने आणि शिंदे याच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याकडे भाजपच्या नेत्यांनी पाठ फिरवल्यामुळे तो पक्षप्रवेश पुढे ढकलला होता.
शिवाय भाजपच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांच्या आदेशामुळेच हा प्रवेश थांबवल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता ठाणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना भाजपने काल संध्याकाळी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश करून घेतला. यावेळी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.