ठाकरे बंधुच्या युतीची अधिकृत घोषणा; कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा
मुंबई : खरा पंचनामा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा अखेर आज झाली आहे. ठाकरे अखेर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आले आहेत.
महाराष्ट्र ज्याची प्रतिक्षा करत होता. ती शिवसेना आणि मनसेची युती झाली, हे आज जाहीर करत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
"जे काही बाकी बोलायचं ते जाहीर सभेत बोलू. माझी एक मुलाखत झाली होती. मी मुद्दामहून आठवण करून देतो. त्यात मी म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिथून एकत्र येण्याची सुरुवात झाली. त्या वाक्यापासून झाले. जे निवडणूक लढवत आहेत, त्या सर्व उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल. कधी भरायची ती कळवली जाईल," असे यावेळी राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
तसेच महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवण्याच्या टोळ्या फिरत आहे. त्यात दोन जास्त टोळ्या अॅड झाल्या. त्या राजकीय पक्षातील टोळ्या पळवतात, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, ठाकरे बंधुंच्या घोषणेनंतर मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडून राज्यभरात जल्लोष केला जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.