पुण्यात 'हाफ एनकाउंटर'!
गुंडाच्या पायात घुसली गोळी
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील आवळवाडी फाटा परिसरात पोलिस आणि गुंडांमध्ये थरारक प्रकार घडला आहे. चंदननगर पोलिसांचे तपास पथक एका गुंडाला ताब्यात घेण्यासाठी आवळवाडी फाट्यावर गेले असताना अचानक तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
गुंडांकडून विरोध होत असल्याने आणि स्वतःच्या संरक्षणासाठी चंदननगर तपास पथकातील अधिकाऱ्याने गुंडाच्या पायावर गोळीबार केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी गुंडाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास खराडी पोलीस करत आहेत. घटनेमुळे परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.