सांगलीतील कर्मवीर पतसंस्थेस देश पातळीवरील पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
सांगली : खरा पंचनामा
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या सांगलीतील मुख्यालयास देश पातळीवरील विविध संस्थांचे अधिकारी व पदाधिकारी यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यामध्ये गिर्राज अग्निहोत्री, ज्यांच्याकडे भारत सरकारच्या सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय सहकारी विकास निगम चे महाराष्ट्र गोवा आणि दादरा नगर हवेली चे विभागीय निदेशक म्हणून कार्यभार आहे. त्यांनी कर्मवीर पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली.
एनसीडीसीच्या सरकारी योजना आणि आर्थिक सहाय्याच्या योजना शेवट पर्यंत पोहचविणे यासाठी हा विभाग पुर्ण क्षमतेने काम करीत आहे. पतसंस्थांना या योजनांचा लाभ व्हावा व पतसंस्था हा सहकारातील एक मोठा विभाग राष्ट्रीय पातळीवर मुख्य प्रवाहाशी जोडला जावा यासाठी या विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जात असल्याचे गिर्राज अग्निहोत्री यांनी भेटी दरम्यान सांगितले. त्यामुळे सहकारी संस्थांनी एनसीडीसी च्या पोर्टल मार्फत केंद्रीय पातळीवर मुख्य प्रवाहात यावे अशी सुचना केली. त्यांनी कर्मवीर पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. मोठ्या संस्थांनी एनसीडीसी सोबत समन्वय ठेवून काम केल्यास त्याचा सभासदांना व संस्थेला लाभ होईल असा आशावाद व्यक्त केला.
यापुर्वी गिर्राज अग्निहोत्री यांच्याकडे संपुर्ण देश पातळीवर साखर कारखान्याना आर्थिक सहाय्य व समन्वयाची जबाबदारी होती. त्याचा सदर्भ त्यांनी या भेटीवेळी दिला. तसेच इंडीयन चेंबर्स ऑफ कॉमर्स फॉर एससी एसटी आणि महिला उद्योजक, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुबीर पॉल, जनरल सेक्रेटरी इंडीयन चेंबर्स ऑफ कॉमर्स फॉर एससी एसटी आणि महिला उद्योजक आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी ओडीसाच्या राज्य समिती सदस्या श्रीमती हेमा एक्का आणि मिनिस्ट्री ऑफ स्कील डेव्हलपमेंच्या वतीने अनिल शेवाळे यांनी कर्मवीर पतसंस्थेच्या सांगली येथील मुख्यालयास एकत्र सदिच्छा भेट दिली. ही मंडळी सांगली येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आली होती. त्यावेळी त्यांनी कर्मवीर पतसंस्थेला आवर्जुन भेट दिली. त्यांनी कर्मवीर पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेतला व कर्मवीर पतसंस्थेच्या कार्याचा आपल्या मनोगतात गौरव केला. सहकाराच्या विकासासाठी विविध पातळीवर आपल्याला एकत्र काम करता येवू शकते याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
या भेटी बद्दल कर्मवीर पतसंस्थेच्या वतीने चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांनी या सर्वांचे स्वागत केले. यावेळी डॉ. आशुतोष चोपडे, अॅड. व्ही. एस. पवार, प्रा. चव्हाण, श्री. व्हसवाडे व कर्मवीर पतसंस्थेचे सेवक उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.