शीतल तेजवाणीच्या माहेरच्या घरी पुणे पोलिसांची झाडाझडती
पुणे : खरा पंचनामा
शीतल तेजवानीच्या पिंपरीतील माहेरच्या घरी पुणे पोलीस पोहोचले आहेत. पोलिसांकडून इथं झाडाझडती घेतली जात आहे. पोलीस कोठडीत असलेल्या शीतलकडून महत्वाची कागदपत्रे हस्तगत करायची आहेत. मूळ कुलमुखत्यार पत्र, मूळ दस्त, तसेच 300 कोटींपैकी काही रक्कम हस्तगत करायची आहे. त्या अनुषंगाने पुणे पोलीस पिंपरीच्या घरी आले आहेत.
शीतल तेजवाणी आणि तिचे पती सागर सूर्यवंशी सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. मात्र तिचं माहेर हे पिंपरीतील वैष्णो देवी मंदिराजवळ आहे. शितलने याचं माहेरच्या घरात काही पुरावे दडवून ठेवले असतील, अशी शंका पुणे पोलिसांना आहे.
मुंढव्यातील 40 एकर जमीन घोटाळाप्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. त्यामध्ये, प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी मुख्य सुत्रधार म्हणून शीतल तेजवाणी याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली.
पुणे जमीन घोटाळा प्रकरणातील दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी शीतल तेजवानीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी देखील झाली. मीडिया रिपोर्ट्समुळं आपणास लक्ष्य केलं जात असल्याचा दावा तेजवानीने याचिकेत केला होता. एफआयआर मीडिया रिपोर्टवर गुन्हा दाखल केला असून मीडियात फरार घोषित करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. दुसऱ्या जमिनीप्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून तेजवानीची उपस्थिती आवश्यक असल्याचा युक्तिवाद देखील वकिलांनी केला होता. मुंढवा जमीन गैरव्यवहाराबद्दल आधी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बावधन पोलीस ठाण्यात दिग्वीजय पाटील, शीतल मेजवानी आणि रविंद्र तारु यांच्या विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, पुणे पोलिसांनी देखील यात उडी घेत नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता, शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.