Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोरेगावच्या पोलिस अधिकाऱ्याची संभाषण क्लिपविधान परिषदेत शशिकांत शिंदेंचा 'पेन ड्राइव्ह बॉम्ब'

कोरेगावच्या पोलिस अधिकाऱ्याची संभाषण क्लिप
विधान परिषदेत शशिकांत शिंदेंचा 'पेन ड्राइव्ह बॉम्ब'

नागपूर : खरा पंचनामा 

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आज आमदार शशिकांत शिंदे यांनी पेन ड्राइव्ह बॉम्ब फोडला आणि खळबळ उडवून दिली, 'तुम्हाला दोन नंबरचे धंदे करायचे आहेत ते करा, मुक्तपणे करा', अशा प्रकारच्या कोरेगाव पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याच्या अवैध व्यावसायिकासोबतच्या संभाषणाच्या क्लिपचा पेन ड्राइव्ह मी आपल्याला देतो, असे म्हणत या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षकांना द्यावेत, अशी मागणी आमदार शिंदे यांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे केली.

कोरेगाव पोलिस ठाण्याशी संबंधित प्रश्न उपस्थित करताना आमदार शिंदे म्हणाले, "गुन्हा कसा राजरोस करावा, याबाबतची या पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याची एक क्लिप मी तुम्हाला पाठवतो. या ठिकाणी प्रचंड प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू आहेत. त्याचबरोबर मारहाण करणारे, खून करणारे आरोपी मोकाट सोडले आहेत, त्याची यादी मी तुमच्याकडे देईन. माझ्याकडेही कारण नसताना दोन वेळा पोलिस आले होते. याबाबतच्या चौकशीची ऑर्डर पोलिस अधीक्षकांनी काढली; परंतु अजूनही चौकशी सुरू झाली नाही. एकदा तर दारू पिऊन पोलिस आला होता.

यासंदर्भात मी तक्रार केली; पण अद्यापही पोलिस अधीक्षक, उपअधीक्षकांनी कारवाई केली नाही. मग सर्वसामान्यांचे काय होत असेल? असा प्रश्न आमदार शिंदे यांनी उपस्थित केला. सभापतींना उद्देशून आमदार शिंदे म्हणाले, "मी आपल्याला एक पेन ड्राइव्ह देतो. त्यातील संभाषणामध्ये ते सरळ सरळ सांगतात, की 'तुम्हाला दोन नंबरचे धंदे करायचे आहेत, ते करा, मुक्तपणे करा" अशा प्रकारचे ते संभाषण आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षकांना कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मारहाण करणाऱ्यांना पाठीशी घातली जाते. 'तुमचे गुन्हे दाबतो, तुम्ही आम्हाला मदत करा, असे म्हणत सरळसरळ पैशांची मागणी करतात', असा आरोप आमदार शिंदे यांनी केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.