"सत्ताधारी नेत्यांच्या अवजड बॅगांची तपासणी होत नाही, पण आमच्या रिकाम्या गाड्यांची तपासणी होते"
पिंपरी : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचेआमदार रोहित पवार यांच्या वाहनांची पिंपरी चिंचवडमध्ये तपासणी करण्यात आली आहे. रोहित पवार आज बैठकीसाठी शहरात आले आहेत. ते मुंबई वरुन हेलिकॉप्टरने पिंपरी चिंचवडच्या एका कंपनीतील हेलिपॅडवर आले.
त्याठिकाणी रोहित पवारांना घेण्यासाठी आलेल्या वाहनांची पोलिसांनी तपासणी केल्याचे पाहायला मिळाले. याच मुद्यावरुन रोहित पवारांना निवडणूक आयोगाला टोला लगावला आहे. सत्ताधारी नेत्यांच्या अवजड बॅगांचीही तपासणी होत नाही, मात्र आमच्या रिकाम्या गाड्यांची कसून तपासणी होते, असा टोला रोहित पवारांनी लगावलाय.
महापालिका निवडणुकांची आचारसंहिता सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मात्र सत्ताधाऱ्यांच्या बॅग तपासल्या जात नाहीत, आमच्या रिकाम्या गाड्या तापसल्या जातात. अशी टीका रोहित पवारांच्या फेसबुक पोस्टवर करण्यात आली आहे. कार्यक्षम आणि तत्पर निवडणूक आयोगाचं कौतुक आणि कमाल वाटते. सत्ताधारी नेत्यांच्या अवजड बॅगांचीही तपासणी होत नाही, मात्र आमच्या रिकाम्या गाड्यांची कसून तपासणी होते, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.