Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बांगलादेशात आणखी एका विद्यार्थी नेत्यावर गोळीबार

बांगलादेशात आणखी एका विद्यार्थी नेत्यावर गोळीबार

दिल्ली : खरा पंचनामा

बांगलादेशमध्ये आणखी एका विद्यार्थी नेत्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. विद्यार्थी नेते मोहम्मद मोतालेब सिकदर (वय ४२) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे.

त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून रूग्णालयात सिकदर यांच्यावर उपचार सुरू आहेत. बांगलादेशातील खुलना शहरात आज (सोमवारी) दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या महिन्यात बांगलादेशमध्ये दोन विद्यार्थी नेत्यांवर गोळीबार झाला आहे. शरीफ उस्मान हादी यांच्यावर ढाका येथे १२ डिसेंबर रोजी अज्ञातांनी गोळीबार केला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात आंदोलन सुरू झाले. तसेच हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.

मोहम्मद मोतालेब सिकदर हे नॅशनल सिटीझन पार्टीचे वरिष्ठ नेते होते. खुलना शहरातील सोनदंगा भागात त्यांच्या निवासस्थानी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सिकदर यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कामगारांचा मोर्चा काढण्याबाबत आयोजित बैठकीची तयारी करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. सिकदर हे नॅशनल सिटीझन पार्टीच्या कामगार विंगचे प्रमुख होते, याबाबत 'प्रथोम आलो' वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

शरीफ उस्मान हादी (वय ३२) हे बांगलादेशमधील 'इन्कलाब मंच'चे युवा नेते व प्रवक्ते होते. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जुलै २०२४ आंदोलन झाले होते. त्या आंदोलनानंतर 'इन्कलाब मंच' ही संघटना उदयास आली. या संघटनेला युवकांचा मोठा पाठिंबा मिळाला. शेख हसीना यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनात हादी हे अग्रस्थानी होते. त्यांनी हसीना यांच्यावर वेळोवेळी टीका केली होती. हसीना यांचे सरकार गेल्यानंतर हादी हे विद्यार्थी व स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमधील प्रमुख दुवा होते. विद्यार्थ्यांच्या मागण्या ते सरकारसमोर मांडत होते. फेब्रुवारी २०२६ मध्ये ते निवडणूक लढवणार होते. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.