स्ट्राँग रुमबाहेर अजितदादा गटाबरोबरच शिंदे गटाचाही जागता पहारा
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीचे मतदान 2 डिसेंबरला पार पडले आहे. काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्यासाठी 20 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे.
त्यानंतर 21 डिसेंबरला एकत्रितपणे सर्व निवडणुकींचे निकाल जाहीर होणार आहेत. 2 डिसेंबरला झालेल्या मतदानाच्या मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. अशातच आता उमेदवारांकडून EVM मशीनमध्ये फेरफार होऊ नये साठी काळजी घेतली जात आहे. जळगाव, धाराशिव, धुळे आणि सोलापूरमधील उमेदवार स्ट्राँग रूमच्या बाहेर पहारा देत असल्याचे समोर आले आहे. यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा समावेश आहे.
जळगावच्या जामनेर येथे शिवसेना व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून स्ट्रॉग रूमच्या बाहेर पहारा दिला जात आहे. जामनेर येथील स्ट्राँग रूम परिसरात पोलीसांचा मोठा बंदोबस्त असून एसआरपीएफचे सशस्त्र जवान देखील तैनात करण्यात आलेले आहे. मात्र शिवसेनेला सत्ताधारी मित्रपक्ष भाजपवर विश्वास नसल्याकारणाने स्ट्रॉग रूमच्या बाहेर पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून पहारा दिला जात असल्याचे बोलले जात आहे. दिवसातून तीन ते चार वेळेत आलटून पालटून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि कार्यकर्ते पहारा देत आहेत.
धाराशिव मधील परंडा नगरपालिकेलाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडले आहे. परांड्यातील स्ट्रॉग रूमभोवती पोलीसांसह राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि उमेदवार पहारा देताना दिसत पहायला मिळत आहे. दोन कार्यकर्ते रात्री या ठिकाणी थांबतात आणि दिवसा इतर कार्यकर्ते स्ट्राँग रूमच्या बाहेर असतात. पोलीसांबाबत आम्ही देखील पहारा करतो असं यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.