Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत तडीपार गुन्हेगाराचा दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला

सांगलीत तडीपार गुन्हेगाराचा दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला 

सांगली : खरा पंचनामा 

शहरातील शामरावनगर येथे तडीपार गुन्हेगाराने दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. यामध्ये सांगली आणि कुपवाड येथील दोघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली असून हल्लेखोर गुन्हेगार पसार झाला आहे. हद्दपार गुन्हेगार सांगलीत आलाच कसा? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. महापालिका निवडणुकीच्या आधी शहरात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान या हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

सिध्दार्थ लक्ष्मण पुकळे (रा. कुपवाड शिवनेरी नगर), सचिन प्रकाश पोळ (रा. शामराव नगर, सांगली) अशी जखमीची नावे आहेत. मेघशाम उर्फ मोट्या जाधव असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे. मंगळवारी दुपारी पुकळे आणि पोळ शामरावनगर येथे बोलत थांबले होते. त्यावेळी संशयित जाधव तेथे आला. त्याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने दोघांवरही हल्ला केला. दोघांच्याही पोटावर वर्मी घाव बसले आहेत.

हल्ला झाल्यानंतर दोघांनीही आरडा ओरडा केल्यावर संशयित मोट्या जाधव पसार झाला आहे. सांगली शहर पोलीस आणि एलसीबीचे पथक त्याचा शोध घेत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.