फुटपाथवरच महिलेची प्रसूती; महिला पोलिसांचा मदतीचा हात
मुंबई : खरा पंचनामा
प्रसूती वेदनेने एक विवाहिता फुटपाथवरच विव्हळत होती. अखेर काही समजायच्या आत तिने फुटपाथवरच एका बाळाला जन्म दिला. तिला मदतीची नितांत आवश्यकता असताना तेवढ्यात डोंगरी पोलिसांचे पथक तेथे पोहचले आई आणि बाळाला तत्काळ जे. जे. इस्पितळात नेले. परिणामी दोघांनाही तत्काळ उपचार मिळू शकले.
उमरखाडीच्या सामंतभाई नानजी मार्गावरील टिपसी बारजवळच्या फुटपाथवर धारावीत राहणारी माला देवी नाडर ही महिला शनिवारी सकाळच्या वेळेस प्रसुती वेदनेने विव्हळत आहे. तिला तत्काळ मदतीची आवश्यकता असल्याचा कॉल डोंगरी पोलिसांना आला. त्यानुसार उपनिरीक्षक रासम, महिला अंमलदार जाधव, सावंत टेकाळे, जाधव, सावंत तसेच उपनिरीक्षक साबणे, गायकवाड, फड, गाडे ही दोन पथके त्या ठिकाणी पोहचली आणि मदत कार्य केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.