Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रावसाहेब पाटील यांना मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल कर्मवीर पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

रावसाहेब पाटील यांना मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल कर्मवीर पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

सांगली : खरा पंचनामा

कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगलीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक रावसाहेब जिनगोंडा पाटील यांना नुकतेच दिल्ली स्थित नीती आयोग मान्यता प्राप्त सॉक्रेटिस सामाजिक संशोधन विद्यापीठाच्यावतीने 'मानद डॉक्टरेट' पदवी सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आली. याबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या संचालक मंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. एस. पी. मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला.

या सत्कार प्रसंगी व्हाईस चेअरमन अॅड. एस. पी. मगदुम म्हणाले कि, आमचे सहकारी रावसाहेब पाटील आता डॉ. रावसाहेब पाटील झाल्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. त्याचा इथंपर्यंतचा प्रवास प्रेरणादाई आहे. त्यांनी आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये चौफेर कार्य केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या अखंड सेवावृत्तीबद्दल त्यांना मानद डॉक्टरेट देवून गौरव केलेला आहे.

तर डॉ. रमेश ढबू म्हणाले कि, अगदी एका लहान खेड्‌यातून त्यांच्या जीवनाची सुरुवात झाली. पण त्यांच्यातील अथक परिश्रम करण्याची वृत्ती, चिकाटी, दुरदृष्टी आणि नवनविन संकल्पनाना प्रत्यक्षात आणण्याची हातोटी यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आव्हाने पेलण्याची आणि संघर्ष सहन करण्याची तयारी तसेच जिद्द आणि शिस्तप्रियता, सकारात्मक विचाराची जोपासणा यामुळे त्यांना इथंपर्यतचे यश संपादन करता आले.

सर्व संचालक मंडळ तसेच सेवकांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी संचालक डॉ. अशोक आण्णा सकळे, वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, ओ. के. चौगुले (नाना) डॉ. एस.बी. पाटील (मोटके), डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदुम यांच्यासह अधिकारी व सेवक उपस्थित होते. सुत्रसंचालन संजय सासणे यांनी केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.