अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचा खून, वालचंदनगर पोलिसांनी पतीला जेजुरीत ठोकल्या बेड्या!
संभाजी पुरीगोसावी
पुणे : खरा पंचनामा
पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर पोलीस ठाणेच्या हद्दीतील शेळगांव गावातील सौ. मनीषा मल्हारी खोमणे (वय 35) या महिलेचा मंगळवारी पहाटेच्या सुमारांस पती मल्हारी उर्फ बापू खोमणे यांने डोक्यात लाकडाने जबर प्रहार करून खून केला. त्यानंतर आरोपी पतीने घटनास्थळावरून धूम ठोकली होती. त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता राहत्या घरी मयत महिला या अंघोळीसाठी जात असताना पाठीमागून आरोपी पतीने तिच्या डोक्यात जोराचा प्रहार केल्याने ती जागीच मृत्युमुखी पडली. घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुगणे, पोलीस उपनिरीक्षक रथीलाल चौधरी, हवालदार दादासाहेब डोईफोडे, गुलाब पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आरोपी पती मल्हारी (उर्फ बापू) खोमणे याला याला शोधण्यासाठी वालचंदनगर पोलिसांनी तातडीने पथके माळेगांव, जेजुरी, नातेपुते अन्य दिशेने पथके मार्गस्थ केली.
अखेर काही तासांतच आरोपींला जेजुरीत वालचंदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असुन आरोपी मल्हारी उर्फ बापू याच्यावर यापूर्वी वालचंदनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी पतीने अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वालचंदनगर पोलीस ठाणेचे सहायक निरीक्षक राजकुमार डुणगे, उपनिरीक्षक रथीलाल चौधरी, दादासाहेब डोईफोडे, गुलाब पाटील, गणेश काटकर, महेश पवार, कीर्तीलाल गायकवाड, ज्योती डिसलें आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.