Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना मिळणार सदस्यत्व आणि मतदानाचा अधिकारमंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना मिळणार सदस्यत्व आणि मतदानाचा अधिकार
मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबई : खरा पंचनामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनसामान्यांशी निगडित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत चार महत्त्वाच्या घोषणा करण्यात आला.

यात अगदी नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेवर घेण्याबाबत मोठा निर्णय झाला आहे. आजच्या बैठकीत प्रामुख्याने नगरपरिषद प्रशासन, ग्रामीण आरोग्य सेवा आणि महापुरुषांच्या स्मारकांसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या.

आजच्या बैठकीतील प्रमुख निर्णय : 
नगरविकास विभागाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा केली जाणार आहे. या सुधारणेनुसार, आता थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांनासभागृहाचे सदस्यत्व तर मिळेलच, शिवाय त्यांना मतदानाचा अधिकारही प्राप्त होणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी लवकरच अध्यादेश काढला जाणार आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा कणा असलेल्या आरोग्य सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याचा निर्णय ग्रामविकास व पंचायत राज विभागाने घेतला आहे.

प्रशासनाचे विकेंद्रीकरण करून ग्राम, तालुका आणि जिल्हा स्तरावरील कारभार अधिक सक्षम करण्यासाठी 'जिल्हा कर्मयोगी २.०' आणि 'सरपंच संवाद' हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

धाराशिव (उस्मानाबाद) शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी महसूल विभागाने दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे समाजाच्या विविध स्तरातून स्वागत होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.