शिगाव येथील मंदिरातील चोरीचा छडा : एकाला अटक
मूर्तीचे दागिने जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
वाळवा तालुक्यातील शिगाव येथील मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील दागिने चोरणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मूर्तीवरील दागिने जप्त करण्यात आले आहेत. सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
प्रकाश जगन्नाथ सदामते (वय ३२ वर्षे रा. आमणापुर ता. पलूस) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. 17 ऑक्टोबर रोजी शिगाव येथील लक्ष्मी मंदिर फोडून अज्ञाताने देवीच्या मूर्तीवरील दागिने चोरून नेले होते. सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी एकजण मिरजवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचला.
संशयित सदामते तेथे आल्यावर त्याला ताब्यात घेऊन पथकाने कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून 60 हजारांचे दागिने जप्त करण्यात आले. त्याला आष्टा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, संदिप गुरव, अतुल माने, उदयसिंह माळी, सोमनाथ गुंडे, सुरज थोरात, अभिजीत ठाणेकर, रोहन घस्ते, रणजीत जाधव, संकेत कानडे, पवन सदामते, गणेश शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.