Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भावाला पोलिस करण्यासाठी उपनिरीक्षकाने डमी बनून दिली परीक्षानऊ वर्षांनंतर प्रकार उघडकीस; गुन्हा दाखल, एकाला अटक

भावाला पोलिस करण्यासाठी उपनिरीक्षकाने डमी बनून दिली परीक्षा
नऊ वर्षांनंतर प्रकार उघडकीस; गुन्हा दाखल, एकाला अटक

पुणे : खरा पंचनामा

आपल्या सख्या भावाला पोलिसाची वर्दी मिळवून देण्यासाठी एका पोलिस उपनिरीक्षकाने 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटातील कथेप्रमाणे 'डमी' पेपर दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या उपनिरीक्षकाने २०१६ मध्ये झालेल्या परिक्षेत भावाच्या जागी स्वतःच लेखी परीक्षा दिली. नऊ वर्षांनी त्याच्या हा फसवेपणा उघडकीस आला असून त्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्पडसिंग शिवलाल गुसिंगे असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याच्यासह भाऊ गजानन शिवलाल गुसिंगे (दोघे रा. रा. कौचलवाडी, रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना) यांच्याविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासविणे, कट रचणे या भारतीय दंड संहितेच्या कलमांसह परीक्षांमधील गैरप्रकारास प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ एप्रिल २०१६ शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर घडली होती. गुसिंगे हे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात नियुक्तीस आहेत.

पुणे शहर पोलिस दलातर्फे २०१६ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यासाठी गजानन गुसिंगे याने अर्ज केला होता. त्यानुसार त्याने पाच व सहा एप्रिल २०१६ ला मैदानी परीक्षा दिली. त्यानंतर २४ एप्रिलला असलेल्या लेखी परीक्षेसाठी गजानन याच्या ऐवजी सुप्पडसिंग यांनी परिक्षा दिली. त्यासाठी त्यांनी बनावट ओळखपत्रेही तयार केली. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी गजाननचा आणि त्याच्या जागी परीक्षा देणाऱ्या तोतया व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेकडून या दोघांचा शोध घेण्यात येत होता. या लेखी परीक्षेच्या चित्रीकरणात गजाननच्या जागी लेखीआयुक्तालयात नियुक्तीस आहेत.

पुणे शहर पोलिस दलातर्फे २०१६ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यासाठी गजानन गुसिंगे याने अर्ज केला होता. त्यानुसार त्याने पाच व सहा एप्रिल २०१६ ला मैदानी परीक्षा दिली. त्यानंतर २४ एप्रिलला असलेल्या लेखी परीक्षेसाठी गजानन याच्या ऐवजी सुप्पडसिंग यांनी परिक्षा दिली. त्यासाठी त्यांनी बनावट ओळखपत्रेही तयार केली. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी गजाननचा आणि त्याच्या जागी परीक्षा देणाऱ्या तोतया व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेकडून या दोघांचा शोध घेण्यात येत होता. या लेखी परीक्षेच्या चित्रीकरणात गजाननच्या जागी लेखी परीक्षा देणारी तोतया व्यक्ती दिसत होती. ही व्यक्ती गजाननचा सख्खा भाऊ सुप्पडसिंग असल्याचे एका साक्षीदाराने सांगितले.

तपास सुरू असताना सुप्पडसिंग महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून माहिती मागविली असता, सुप्पडसिंगची २०२३ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून नेमणूक झाली झाल्याचे समजले. त्यानुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज्य राखीव दल गट क्रमांक सात येथून आरोपी सुप्पडसिंग यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. तर आरोपी गजाननचा शोध सुरू आहे. परीक्षा देणारी तोतया व्यक्ती दिसत होती. ही व्यक्ती गजाननचा सख्खा भाऊ सुप्पडसिंग असल्याचे एका साक्षीदाराने सांगितले.

आरोपींनी बनावट ओळखपत्र कुठून तयार केली, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी सहायक निरीक्षक दादासाहेब पाटील आणि सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी केली. बचाव पक्षातर्फे अॅड. चेतन भुतडा यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपी उपनिरीक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.