महाडमधील राडा प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल..
अलिबाग : खरा पंचनामा
महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह आठ जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुशांत जाबरे यांनी महाड तालुका पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. मतदान केंद्रावर आढावा घेण्यासाठी गेलो असता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गाड्या फोडल्या, सोबतच्या व्यक्तींना मारहाण केली, अंगरक्षकाकडील रिव्हॉल्वर हिसकावुन घेतली आणि सोन्याची चेन, मोबाईल लंपास केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या मारहाणीमध्ये जाबरे यांच्या सोबतच्या पाच जणांना गंभिर दुखापत झाल्याचे देखील तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
या तक्रारीनंतर विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालूसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालूसरे, वैभव मालूसरे, सुरज मालूसरे, सिद्धेश शेठ आणि इतर अनोळखी आठ ते दहा जणांविरोधाता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा हा गुन्हा महाड तालुका पोलिस ठाण्यात दाखल करून तपासा करिता महाड शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी कोणासही अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
नवेनगर परिसरात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. शाब्दिक चकमकीनंतर, हाणामारी आणि वाहनांची तोडफोडही करण्यात आली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पालकमंत्री पदावरून सुरू झालेला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद आता मारझोड आणि तोडफोडीपर्यंत पोहोचल्याचे यानिमित्ताने दिसून आले होते.
शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर बंदूक रोखण्यात आल्याचा आरोप केला. मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ही बंदूक हिस्कावून घेत ती पोलीसांच्या ताब्यात दिली. या घटनेमळे परिस्थिती चिघळल्याचा दावा विकास गोगावले यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसने परराज्यातील लोकांना आणून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.