Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्य उत्पादन शुल्ककडील पाच उपाधीक्षकांना अधीक्षकपदी पदोन्नती सांगलीचे तत्कालीन उपाधीक्षक ऋषिकेश इंगळे यांचा समावेशहर्षवर्धन शिंदे यांच्यासह दोघांची पदोन्नती नियमित

राज्य उत्पादन शुल्ककडील पाच उपाधीक्षकांना अधीक्षकपदी पदोन्नती 
सांगलीचे तत्कालीन उपाधीक्षक ऋषिकेश इंगळे यांचा समावेश
हर्षवर्धन शिंदे यांच्यासह दोघांची पदोन्नती नियमित 

मुंबई : खरा पंचनामा 

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील पाच उपाधीक्षकांना अधीक्षपदी पदोन्नती देऊन त्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. तर हर्षवर्धन शिंदे यांच्यासह दोघांची पदोन्नती नियमित करण्यात आली आहे. राज्य शासनाचे उप सचिव रविंद्र औटे यांच्या सहीने मंगळवारी हे आदेश काढण्यात आले आहेत. पदोन्नती झालेल्यामध्ये सांगलीचे तत्कालीन उपाधीक्षक ऋषिकेश इंगळे यांचा समावेश आहे.

पदोन्नती झालेले अधिकारी तसेच त्यांची पदस्थापना 
उल्हास शिंदे : अधीक्षक, ठाणे 2
सुधीर पोकळे : अधीक्षक, मुंबई शहर
ऋषिकेश इंगळे : अधीक्षक, अहिल्यानगर 2
चारुदत्त हांडे : अधीक्षक, बुलढाणा
वैभव वैद्य : अधीक्षक, नागपूर 2

धाराशिवचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे तसेच बाबासाहेब भूतकर यांची पदोन्नती नियमित करण्यात आली आहे. तर विना वेतन रजेवरून हजर झालेले चरणसिंग रजपूत यांची मुंबई उपनगर 2 चे अधीक्षक म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.