सांगली जिल्ह्याचा फुटबॉल खेळाडू राजवीर देसाई याची 'प्रोजेक्ट महादेवा'साठी निवड
सांगली : खरा पंचनामा
महाराष्ट्र शासन, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, मित्रा, यांच्या संयुक्त विद्यमाने "प्रोजेक्ट महादेवा" (Project Mahadeva) हा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कल्पनेतून नुकताच सुरू केला आहे, ज्याचा उद्देश १३ वर्षांखालील मुला-मुलींमधील फुटबॉल प्रतिभेचा शोध घेणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देणे हा आहे, या निवडी 4 नोव्हेंबरपासून जिल्हा व प्रादेशिक स्तरावर सुरू झाली व मुंबईमध्ये पाच डिसेंबर रोजी कूप्रेज ग्राउंड वर या उपक्रमाचा महाराष्ट्र सरकारचा ब्रँड अँबेसिडर टायगर श्रॉफ यांच्या उपस्थितीत अंतिम निवड चाचणी होऊन यामध्ये सांगली जिल्ह्यामधून एकमेव राजवीर नरेंद्र देसाई याची या प्रोजेक्टमध्ये महाराष्ट्र शासनतर्फे निवड झाली आहे.
त्याला आता महाराष्ट्र शासनामार्फत पाच वर्ष प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांना भेटण्याची त्यांच्यासोबत खेळण्याची संधी 14 डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियम मुम्बई येथे मिळणार आहे. राजवीर देसाई हा बार्न्स स्कूल नाशिक, बाईचींग भुतिया फुटबॉल अकॅडमीचा खेळाडू असून तो यापूर्वी अनेक राज्यांमध्ये व विदेशामध्ये तेरा वर्षाखाली मुलांमध्ये खेळला आहे याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक तसेच अभिनंदन होत आहे.
राजवीर यास बाईचींग भुटिया फुटबॉल अकॅडमी, बार्न्स स्कूल नाशिक चे प्रशिक्षक अनिरुद्ध झांबरे, सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन अध्यक्ष जगु सय्यद, प्रशिक्षक राजू कांबळे, तिरंगा फुटबॉल अकॅडमीचे असिफ सारवान यांचे मार्गदर्शन लाभले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस विलासराव देसाई यांचा तो नातू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.