Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एकनाथ शिंदेंनी हेलिकॉप्टरमधून आणलेल्या दोन बॅगांमध्ये काय सापडलं? पैशांनी भरल्या होत्या दोन्ही बॅग?

एकनाथ शिंदेंनी हेलिकॉप्टरमधून आणलेल्या दोन बॅगांमध्ये काय सापडलं? पैशांनी भरल्या होत्या दोन्ही बॅग?

मालवण : खरा पंचनामा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवणमध्ये सभेसाठी दाखल झाले, तेव्हा त्यांच्यासोबत दोन मोठ्या बॅगा होत्या. या बॅगेत पैसे भरले होते असा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.

मालवणमध्ये सभेसाठी आलेल्या एकनाथ शिंदेंनी जनतेसाठी कोणतेही घोषणा केली नाही. मात्र येताना त्यांनी आणलेल्या दोन जड बॅगा पैशाच्या होत्या आणि त्या पैशाचं रात्रभर वाटप झालं असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैशांच्या बॅगा आणल्या होत्या. निलेश राणे यांनी सुद्धा या पैसांचा वाटप केलं असा दावा करत वैभव नाईक यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. भाजपाचे पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप निलेश राणेंनी यापूर्वी केला आहे. त्यानंतर वैभव नाईक यांनीदेखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर व्हिडिओ शेअर केला आहे.

भाजपावर आरोप करणारे निलेश राणे आणि भाजपा एकाच नाण्याच्या बाजू आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुका पैसे वाटून हे लोक जिंकलेले आहेत असाही दावा त्यांनी केला.

वैभव नाईकांनी एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. "एकीकडे निलेश राणेंनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले, परंतु निलेश राणे आणि शिंदे- शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही. परवा एकनाथ शिंदे मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेरा पासून लपण्यासाठी धावत आहेत हे वरील व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवण मधील मतदारांना वाटले आहेत. राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे- शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे," असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेने विचार पूर्वक मतदान करावे असे आवाहन वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केलं आहे.

शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर ! या आधी नाशिकमध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या. लोकशाहीची ऐशी की तैशी? अशी पोस्ट संजय राऊतांनी केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.