Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नर्तिका दिपाली पाटीलची गळफासाने आत्महत्या, भाजप नेत्याला अटक

नर्तिका दिपाली पाटीलची गळफासाने आत्महत्या, भाजप नेत्याला अटक

अहिल्यानगर : खरा पंचनामा

जामखेड येथील साई लॉजमध्ये नर्तिका दिपाली गोकुळ पाटील (वय 35, रा. कल्याण, सध्या जामखेड) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड याला जामखेड पोलिसांनी अटक केली आहे. लग्नासाठी जबरदस्तीचा दबाव आणल्यामुळे दिपालीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली पाटील जामखेडमधील तपनेश्वर भागात मैत्रिणींसोबत राहत होती. शुक्रवारी सकाळी ती 'बाजारात जाते' असे सांगून घराबाहेर पडली. अनेक तास उलटल्यानंतरही ती परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. चौकशीत रिक्षाचालकाने तिला साई लॉजवर सोडल्याचे सांगितले. सायंकाळी मैत्रिणी लॉजमध्ये पोहोचल्यावर खोली आतून बंद होती. लॉज कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला असता दिपालीने गळफास घेतल्याचे आढळले. पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

या प्रकरणी दिपालीवर लग्नासाठी दबाव आणणाऱ्या संदीप गायकवाडविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. गायकवाड हा भाजपचा माजी नगरसेवक असून त्याचे नाव या प्रकरणात प्रमुखत्वाने समोर आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.