"विरोधीपक्षनेतेपद द्या नाहीतर, उपमुख्यमंत्रीपद तात्काळ रद्द करा"
मुंबई : खरा पंचनामा
केंद्र सरकारचा मजबूत पाठिंबा असताना हे सरकार दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेतेपद द्यायला का घाबरत आहे, असा सवाल उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या सरकारवर निशाणा साधला. तसेच, दोन्ही सभागृहाला विरोधीपक्षनेतेपद देत नसाल तर, उपमुख्यमंत्रीपद तात्काळ रद्द करा, अशीही मागणी ठाकरेंनी केली.
"विरोधी पक्षनेते पद हे त्यांनी द्यायलाच पाहिजे, त्याबद्दल आम्ही या सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात मागणी केली होती. पण आता एक वर्ष होऊन गेलं. एका वर्षात जाहीरतींशिवाय या सरकारनं काही केलेलं नाही. आता विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा असा काळ आला असेल की, दोन्ही सभागृहात विरोधीपक्षनेते नाही आहेत. हे सरकार मजबूत आहे. दिल्लीचा या सरकारला पाठिंबा आहे. असं असताना हे सरकार विरोधी पक्षनेतेपद द्यायला का घाबरत आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"अनेक भ्रष्टाचारी सोबत घेतले आहेत, त्यांच्यावर त्यांनी पांगरूण घातलं आहे. एवढं करूनही विरोधी पक्षनेतेपदाला हे सरकार का घाबरत आहे. ताबडतोब या सरकारनं दोन्ही सभागृहांसाठी विरोधीपक्षनेते जाहीर केले पाहिजे. तसेच कायदे दाखवणार असाल तर, उपमुख्यमंत्रीपद हे तात्काळ रद्द केलं पाहिजे. कारण संविधानात कुठेही उपमुख्यमंत्रीपदाची तरतूद नाही. त्यामुळं त्यांच्याकडे काही खाती असतील, त्या खात्याच्या चाव्या किंवा बावाथरूमच्या चाव्या द्या, पण त्यांचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख करू नका. कायद्यानुसार आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या सरकारनं विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहात या अधिवेशात जाहीर केली पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
"मुख्यमंत्र्यांना उलट उत्तर देता येतं, सरळ उत्तर देता येत नाही. मला केंद्रीय कृषीमंत्र्यांचं अभिनंदन करायचं आहे. कारण त्यांनी यांचे दात घशात घातले आहेत. त्यांचं सोंग आणि डोंग उघडं पाडलं आहे. साधरणतः सप्टेंबरपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीचं संकट सगळ्यांनी अनुभवलं आहे. त्यानंतर आपत्ती म्हणून अतिवृष्टी जाहीर करायला पाहिजे होती. ओला दुष्काळ ही संज्ञा नाही म्हणून तुम्ही ओला दुष्काळ टाळू शकत नाही. त्यानंतर त्यांनी ओला दुष्काळच्या ऐवजी इतिहासातील मोठं पॅकेज जाहीर केलं. त्या पॅकेजचा पत्ता नाही. त्यामुळ कर्जमुक्ती करणं गरजेचं असताना त्यांनी अद्याप शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं नाही", असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.