कबुतरांना दाणे टाकणाऱ्या व्यापाऱ्याला कोर्टाचा दणका!
देशातील पहिली शिक्षा
मुंबई : खरा पंचनामा
कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. दादर येथील कबुतरखान्याशिवाय इतर ठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात आली.
या निर्णयामुळे काही जण नाराज झाले. त्यावरून अनेक जण रस्त्यावर उतरले. पण मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी कोणताही दिलासा दिला नाही. त्यानंतरही काही जण दादर येथे येऊन दाणे टाकत होते. दादर परिसरात राहणारे व्यापारी नितीनशेठ यांना या प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आणि त्यांना दंड ठोठावला. अशा प्रकारची ही देशातील पहिली शिक्षा असल्याचे सांगितले जात आहे.
नितीनशेठ हे दादर परिसरात राहतात. ते व्यापारी आहेत. दादर परिसरातील कबुतरखाना बंद करण्यात आल्यावर, त्यांनी येथे येत कबुतरांना दाणे टाकले. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. नितीन यांनी चूक कबूल केली. पोलिसांनी सांगितले की हा व्यापारी सार्वजनिक ठिकाणी बंदी घातलेली असतानाही कबुतरांना दाणा टाकत होता. तक्रारी आधारे या व्यापाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. त्याच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली.
याप्रकरणीकोर्टानेव्यापाऱ्याला 5,000 रुपयांचा दंड ठोठावला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी. वाय. मिसाळ यांनी सोमवारी हा निकाल दिला. भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 (ब) अंतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली. व्यापाऱ्याने लोकांचे आरोग्य, जीवन आणि सुरक्षेला धोका पोहचवल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय बीएनएसचेकलम 271 अंतर्गत आरोग्याला घातक आजार पसरवल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला.
या निकालपत्रातकोर्टाने हे स्पष्ट केले आहे की अशा प्रकारची शिक्षा पहिल्यांदाच देण्यात येत आहे. हे एक उदाहरण आहे. त्यामुळे लोकांनी भविष्यात असे कृत्य करु नये असे मत न्यायालयानेनिकालपत्रात स्पष्ट केले. बृहन्मुंबईमहानगरपालिकाने (BMC) यापूर्वीच कबुतरांना दाणे टाकण्यावर प्रतिबंध घातला आहे. ऑगस्ट महिन्यात याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातही सुनावणी झाली होती. हायकोर्टाने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रतिबंध कायम ठेवला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.